या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १९०१.. मनामध्ये संशय उत्पन्न होतात. मनाला अर्धवट अनुभव जरी आले, तरी तेवढ्यानेच अभ्यास करणाराला धैर्य उत्पन्न होतें. सिद्धि प्राप्त झाल्यानंतरही पतन घडते. आपण अभ्यास करूं लागलों ह्मणजे कांहीं दिवस किंवा काही आठवडे मन अगदी शांत असते. आणि ते सहज एकाग्रतेत जाते आणि आपला अभ्यास झपाट्याने चालला आहे असें वाटते. पण एके दिवशी एकाएकी तो अभ्यास बंद पडतो, आणि आपण किनाऱ्यावर पोहोंचलों असे वाटते. धैर्य धरा. सान्या अभ्यासांना चढ आणि उतार हा आहेच. ३१ दुःख, मानसिकव्यथा, शरीरकंप, कमीजास्ती श्वाINE सोच्छास, ही एकाग्रतेच्या भंगाची साधने होत. एकाग्रतेच्या योगाने मनाला परिपूर्ण शांति प्राप्त होते. आणि हरघडी शरीर तिचा अभ्यास करीत रहाते. अभ्यास यथापद्धत न होईल, किवा त्याच्याकडे लागावा तसा लय न लागेल, तर ही विघ्ने उद्भवतात. -उकाराचा जप केल्याने आणि ईश्वरास काया वाचा मन अर्पण केल्याने - मनाला धैर्य येऊन नवा उत्साह प्राप्त होतो. प्रत्येकाच्या ज्ञानतंतूला कप हा बहुधा प्राप्त होतोच. त्याकडे मुळीच लक्ष्य न देतां अभ्यास तसाच चालू ठेवावा. अभ्यास हा ह्या सवीना नीटनेटके करून आसन कायम करतो. ३२ एकाच वस्तूवर लय लावण्याचा अभ्यास (करणे)काए हाच ह्याला उपाय आहे. या मनाला वळवावयाला कांहीं कालपर्यंत एका पदार्थाची आकृति घ्यावी, ह्मणजे ह्या साऱ्या अडचणी दूर होतील. हा सामान्य उपाय आहे. ह्याचा विस्ताराने केलेला खुलासा खालच्या सूत्रांत आहे. कारण, एकाच तन्हेचा अभ्यास सान्यांनाच कांहीं सोईवार नसल्यामुळे अनेक पद्धति सांगितल्या आहेत. आणि प्रत्येकास खानुभवाने आपल्यास अत्यंत हितकारक कोणती ती पसंत करता येईल. माम लापका ३३ वस्तुमात्राशी मैत्री, दया, आनंद, समता, ठेवून तिच्या सुखाने सुखी, व दुःखाने दुःखी होऊन चित्त स्थिर करावे,