या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १९०१.. Maines पुस्तकपरीक्षा. HE Deewan TS T O STEE 1937 (पु. १४ अं. १२ वरून पुढे चालू.) . "मल्हाररावाला आतां येवढं का कळू नये? वास्तविक पाहतां त्याच्या वयाला काही थोडथोडकी नाहींत तरी ४०५० वर्षे तर सहज होऊन गेली. केसांचा काळेपणा जाऊन त्यांवर रुपेरी चमक येऊ लागली. तरी देखील त्यास एवढं करूं नये की आपसांतील कलहाने शत्रू जोरावतो. आपल्यांत फूट आहे एवढं शत्रूस कळलं की पुरे, त्याच वेळी अगदी निखालस समजावं की शत्रूचा जोर दुप्पट वाढला. या फुटींत घाव घालून आपल्या शत्रूचे दोन तुकडे करायला मग तो कध्धी कमी करणार नाही. हे त्या लांकुडफोड्याला सुद्धा कळतं. तो देखील लांकडं फोडीत असतांना लाकडांत कुठं लहानसान भेग अथवा फट आहे की नाही ते अगोदर पाहतो. आणि एखादी फट दिसतांच आपल्या कुन्हाडीचा असा कांहीं एक घाव देतो की त्या घावासरशीच स्या लाकडाचे दोन तुकडे करून तो ते दोन्हीकडे दोन फेंकून देतो. त्याला देखील जर एवढी अकल आहे तर ती या मल्हाररावाला, जो आज कित्येक वर्षे रावबांच्या व आप्पाच्या बरोबरीनं मोंगलाशी झुंजला, हिंदुस्थानांतही ज्यानं आपली समशेर चांगलीच चमकावलीन; वसई भांडवित असतांना आप्पांच्या बरोबर राहून अटोकाट मर्दुमकी करून ज्यानं फिरंग्यांस चांगलाच हात दाखविलान; निजामाच्या कपटप्रयुक्तीवर रावबा व आप्पा कोणच्या प्रकारच्या शकली लढवून त्यांच्या मसलती फेंटाळीत होते हेही ज्याच्या नजरेखालून शेकडो वेळां गेलेलं त्या या मल्हाररावासारख्या चांगल्या अनुभविक व पोक्त सुभेदाराला एवढं कळू नये हे खरोखर अगदीं-अगदी- चमत्कारिक" FOR हा केवळ 'श्रीगणेशा' झाला. पुढे:- OR PUSSEDITS "बळ०-कां आज कांहीं कमजास्ती? PRESE भाऊ०–कमजास्ती? (विचार केल्यासारखे करून) हूँ।