या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. 'कम' आणि 'जास्ती' अन् 'जास्ती' आणि 'कम' ! हे असं जगामध्ये आहे ह्मणूनच ठीक आहे. नाही तर मनुष्य अगदी बेफिकीर रहाता. बेफिकीर रहता येवढेच नव्हे; तर तो मग को. णाची पर्वाही न बाळगता"! ह्यापुढे शिंद्यांच्या कारभाऱ्यांकडून दत्ताजी पडले, व कुतुबशहाने त्यांचा नि- . र्दयपणे शिरच्छेद केल्याचे अत्यंत करुणास्पद पत्राचे वाचन झाले. नंतर पुन्हां भाऊसाहेब हाणतात:. "कां राव? कां आतां उगीच कां बसला? 'कम' आणि 'जास्ती' आणि 'जास्ती' आणि 'कम' याचा अर्थ आपल्यास कळलाना आतां पुरा ? बळ०-हो हो, पुरा कळला, पुरा कळला ह्मणून आणखी काय विचारतां? भाऊ०-अहो सुख आणि दुःख, जय आणि अपजय, सुदैव व दुर्दैव, ऊन्ह आणि सांवली या दुकलीपुढे मनुष्यमात्राच्या अकला कशा गुंग होऊन जातात! हेच पहा, निजामास मोठ्या अटोकाटीने उदगीरच्या लढाईत जेर करून आह्मांस हव्या तशा तहांत आणला. त्या तहनाम्याची शाईही अजून पुरती वाळला नसेल. रणांत पडलेल्या कित्येक शवांस देखील अजून अग्नि देण्याचा असल सग्रामभूमीस ज्या उत्तम शत्ररक्तांनी स्नान घातलं ते अजून पुरतं गोठलंही नसेल. रणवाद्यांचे सर्वत्र घुमत असणारे गजर अजन बंदहि झाले नसतील. 'हरहर महादव' लन मोठ्या वीरश्रीनं दिलेल्या आरोळ्या अद्याप कर्णरंध्रांत घुमत आहेत. असं असूनही जिवाला स्वस्थता नाही. झाप दक्षा येत नाही........." विश्वासरावाच्या आणि जनकोजीच्या 'दिलदार स्वभावांत झुळझुळ वाहण स्वच्छ निझरोदकाचं स्फटिकमय असें अत्यंत शुद्ध स्वरूप' ग्रंथकारांनी प्रस्तावनत उलेख केल्याप्रमाणे खरोखरच दृष्टीस पडते, ह्यांत शंका नाही. ह्या राजा कुमाराच्या वीरश्रीचा एक मासला: