या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १९०१. "विश्वास-मग असं ह्मणण्यापेक्षा मी तुला नेत नाही, असंच का एकदा साफ सांगून टाकाना? काय, तर मग ह्मणे पंचाननाशी गांठ! वाः काय पण पंचानन! पंचानन आणि बिंचानन ! जोपर्यंत त्यानें, ही माझी समशेर पाहिली नाहीं तोपर्यंतच काय त्या त्याच्या सगळ्या गर्जना ! चालू देत; चालू देत ह्मणावं त्या हव्या तेवढ्या. काय या पंचाननाची येवढी मातबरी! तो दहा तोंडांचा आणि वीस हातांचा रावण दशानन नव्हता काय? त्याच्याही अशाच वल्गना चालल्या होत्या; पण त्या कोठपर्यंत? जोपर्यंत त्या दाशरथी रामाची आणि त्याची गांठ पडली नव्हती तोपर्यंत ! त्या रामाला त्या दशाननापेक्षां एखादं तोंड अधिक अथवा एखादा हात जास्ती, असं तर काही नव्हतं ना? मग असेना. तो पंचानन असो का शतानन असो! त्याची इतकी भीति ती कशाला पाहिजे? भाऊ, तुह्मींच जर मला पचाननाची भीति सांगू लागलांत, तर झालं. मग सर्वच आटपलं ह्मणायचं. त्यांतून मी ह्मणजे केवळ श्राद्धं झोडणाऱ्या भटमंडळीच्या कुळांतच जन्मास आलो आहे असही काही नाही. "ही पेशवाईच जी मूळ संपादन केली ती आमच्या आजो. बांनी केवळ आपल्या पराक्रमाच्या. अकलेच्या व कर्तबगारीच्या जोरावर संपादन केली.” असं आजपर्यंत तुह्मींच ना मला सांगत आलां? रावबांनी आणि आप्पांनी तर मोगलांशी, निजामाशी, व फिरंग्याशी झुंजतां झुंजतां सर्व हिंदुस्थान आपल्या तरवारीच्या खणखणाटानं अगदी दणाणून सोडलं होतं. असं आप्पांच्या तोंडून तर मा आजपर्यत ऐकत आलों. नानांनी तर माझ्याहून सुद्धां लहान असतां स्वतः जातीनं तलवार धरून शत्रवर चालून जावं, आणि तुह्मीं खुद्द जातीनं लढून मोगलांची यथास्थित कणीक तिंबवावी, आणि त्याच वंशांत उत्पन्न होऊन मी ह्मणे भागुवाइसारख्या बांगड्या घालून पिंपळाला घिरट्या घालीत स्वस्थ बसावं ? हः (विचार कल्यासारखं करून) प्रत्यक्ष चुलता, बाप, आजोबा, व पणजोबा हे सर्व मोठमोठे योद्धे, तलवारबहाद्दर, झुंजारराव, रणदिवे व कडक वीरव्रताचा मोठ्या अभिमानपूर्वक अंगिकार करणारे असावेत आणि त्याच कुळांत जन्मास येऊन त्यांच्या पुतण्यानं. त्यांच्या मलानं. त्यांच्या नातवानं, व त्यांच्याच पणतवंडानं, त्या वीरव्रताचा बेधडक त्याग करून एका हातांत पळीपंचपात्री व दुसऱ्या हातांत दर्भ आणि समिधांची जुडी घेऊन, खांद्यावर एक राजापुरी पंचाची घडी लटकून देऊन सपिंडशिलेदारी पत्करावी ! असं का तुमचं ह्मणणं? असं असेल तर तसं सांगा तरी एकदां." वरच्या उताऱ्यांत त्या कोमल राजकुमाराच्या अंतस्थ शौर्याचा अंकुर फारच जोमदार वठविला गेला आहे, ह्यांत शंका नाही.. खाली दिलेल्या जाटाबरोबरच्या भाषणांत भाऊसाहेबांची चतुराई व दमदारपणा मोठ्या खुबीने व्यक्त केलेला वाचकांच्या दृष्टीस पडेल, तें भाषण असें:-(पा० ६९) "भाऊ-अहो, तुह्मीं माझं ऐकाच असं कुठे मी तुह्मांला ह्मणतो? पण माझं