या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. झणणं तरी ऐकून घ्याल की नाही? तुह्मांला जितका बादशाहीचा अभिमान त्याहून आझांला कमी आहे असं का आपल्याला वाटतं? आझांला तसं जर वाटत असलं तर आह्मी इथवर येतो तरी कशाला? आणि बेगमेच्या बेट्यांना तख्तनशीन तरी करतों कशाला? जेणेकरून बादशाही सलामत राहील तेच आह्मांला करणं! बुबूबेगम यांणी बादशाहीचा बहुत नाश केला. आपली बेटी देऊन दुराणी शेर केला. ही दिल्ली ह्मणजे बादशाही तख्ताची जागा, पण तीहि या गिलच्यांनी आणि दुराणींनी अगदी पायांखालची वाट करून सोडली! मनसूर अल्ली, सुजा उद्दौला, व इतर सरदारमंडळी इराणीला मिळून बादशाहीच्या समूळ नाशाला उद्युक्त झाली. नजीबखान तर बादशाहीचा कट्टा शत्र बनून राहिला आहे. तर अशा घोर प्रसंगांत सांपडलेल्या बादशाहीला बचावून आपला सेवाधर्म सर्व जगाला उघड उघड करून दाखवावा, ह्मणून तर आह्मी येथे आलों-आणि त्या आह्मांवर जर तुमच्यासारख्या बादशाहीच्या दुवागीर, इमानी व नेकजात आधारस्तंभांनी कडकडून बेधडक ढासकून पाडण्याचा बेत केला आणि तेच जर आमचा नाश करायला प्रवृत्त झाले तर मग आमी काय करावं? आतां बादशाही खजिन्याची गोष्ट राहू द्या. पण समजा; तो खजिना जरी तुह्मीं व आह्मीं खर्च केला तरी त्याचा विनियोग बादशाहीच्या बचावाकरितांच व्हायचाना? मग उगीचच्या उगीच असं रागाला पेटून काय उपयोग?" एकंदरीत किराताने प्रस्तुत पुस्तक लिहितांना जितकें धोरण व काळजी घेतलेली आहे, तितके घेणारे लोक, आलीकडच्या पुस्तककर्त्यांच्या मालिकेत फारच थोडे आढळतील. भाऊसाहेबांला दुर्दैवाने अपजय आला, त्याच्या हातून पुष्कळ कृत्ये उतावळीपणाची, नव्हे-अनन्वित सुद्धा झाली, हे जरी खरें, तरी त्याचे खरें खरें अंतःकरण कुलीन राजबिंड्यास शोभेसें उदार होते, हे दाख विण्याकरितां एके ठिकाणी भाऊसाहेबांच्या तोंडी कसे विचार घातले आहेत पहाः-(पा० ७३) "भाऊ०-(आपल्याशी) या जगांत जर अगदी शिध्या मार्गानं सर्व कामं होती तर मग मनुष्याला खऱ्याचं खोटं अन् खोट्याचं खरं असं करण्याची काय जरूर होती ? निरनिराळ्या स्वभावाच्या व निरनिराळ्या प्रकृतीच्या मनुष्याचं एखाद्या गोष्टीसंबंधानं एक मत होणं ह्मणजे किती दुरापास्त ! हा जाट वास्तविक पाहता अगदी सरळ मनुष्य! पण बादशाही खजिन्याची गोष्ट काढल्याबरोबर तो आपला खाडदिशी आपली समशेर काढूनच उभा राहिला! इकडे या आमच्या रावांना आवरावं की तिकडे त्याची समजूत करावी? त्याची समजूत करायला जावं तर हे आमचे रावसाहेब आपल्या डोक्यांत आतांच राख घालून घ्यायला उद्युक्त व्हायचे! एकदरींत सगळीच पंचाईत. हा रागाच्या आवेशांत काकांना धोत्रं बडविण्याची ओळख देतो की काय याचीच सगळ्या गोष्टींपेक्षा मला जास्त भीति पडली होती ! नाही तर