या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १९०१. तेवढ्यानंच आतां अगदी सर्व फिसकटून बसायचं! याबद्दल रावांना एकदां चांगलं बजावून ठेवलं पाहिजे. बरं पण, आता आपण आपली जेवणं आटपून घ्यायला उगीच उशीर तरी कां करावा? विश्वास! हं, तो मघाशीच गेला वाटतं. तर आपणही तिकडेच जावं झालं. (जातो.)" ह्या मोहिमेंतील दरोबस्त झालेल्या दोषांचे खापर बहुतेक लोक जरी बळवंतरावांच्याच माथ्यावर ठेवतात, तरी प्रस्तुत नाटककाराने त्यांचा तसा समज होण्यास कोणकोणती कारणें सबळ होती ती दर्शवून त्यांचा स्वभावही मोठा करारी बनविला आहे. एकंदरीत कोणत्याही कर्त्या पुरुषाच्या पदरी तिळभरही नीचपणा बांधलेला नाही. ह्यावरूनच किराताचे नाट्यकलाप्रावीण्य स्पष्ट दिसून येते. ह्मणून त्या गुणाबद्दल प्रशंसा करावी तेवढी थोडीच वाटते. जाटाच्या एका भाषणाचा व बळवंतरावांच्या उत्तराचा मासला फार चटकदार आहे. तोही येथे देतोः-(पा० ७५) "मल्हार०-(हळूच ) ह्या वेळेस तुह्मी आपल्या शर्ती ठेवाच पुढं. जिन जाट-आमचं ऐकाल तर अगोदर छताचे रुपये काढले आहेत. ह्याकरिता - अगोदर छत यथास्थित करावं, हें एक दुसरं असं की, गाजुद्दीखान याला वजिरात द्यावी. कारण या संबंधानं शिंदे होळकर यांचं व आमचं इमान-प्रमाण गुंतलं आहे. दिल्लीचा शहर पन्हा माझ्या स्वाधीन करावा; व यापुढं छोटा मोठा अर्ज ऐकत जावा, ह्मणजे मी सर्वस्वी आपल्या पदरी आहे. लागेल तो दाणा व साहित्य पुरवीन. - अन् कुंजपुराचं काय पण इराण्यांचं इराण, दुराण्यांचं दुराण, व काबूल कंदाहार, हे देखील जिंकून येईन ! बळ०-असं ह्मणण्यापेक्षां तुह्मी बैल आहां; तुह्मी बुद्धिमंदमल्हार०–बस्स बस्स. राव, तुह्मी मध्ये बिलकुल बोलू नका. बळ०-(न ऐकतां) दगड आहां. तुह्मांला राजकार्य ह्मणजे काय हे माहित नाहीं; धोरण नाहीं; अक्कल नाहीं; छाती नाहीं; हिंमत नाही, असं स्पष्ट का ह्मणाना. या अटी का हे हुकूम? हा छोटा मोठा अर्ज का ही अरेरावी? काय, याला ह्मणावं तरी काय?" ह्यापुढे भाऊसाहेबांच्या अंतःकरणाचे प्रतिबिंब, व मानी स्वभाव ज्यांत ज्यांत व्यक्त होईल अशा दोन भाषणांतील कांहीं उतारा देतो झणजे बस्स्ः- (पा. ११८.) " भाऊ-नुसत्या उपासतापासांच्या वनवासानं मरण्यापेक्षा आपल्या आंगांत जी थोडीबहुत हिंमत आणि मर्दुमकी राहिली आहे तिच्यावरच मरता मरतां शशी दोन हात करून मरूं-रणांगणांत धारातीर्थी मरूं-पण हें बिछान्यावर उपासानं नको मरण यायला. तुमच्याबरोबर हा भाऊ देखील उपास करतो आहे हे कुठं आहे