या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. तुह्मांला ठाऊक? अन् तुह्मांला हे ठाऊक नाही हेही एक प्रकारानं बरंच झालंय ह्यणायचं! नाहीतर ही गोष्ट तुमच्या मनाला लागून त्यापासून फारच अनिष्ट परिणाम व्हायचा. हं: काय ? मी तुमच्या नाशास कारण झालों ? ( काही वेळ स्तब्ध राहून ) हो झालों असंच का होईना? आणि तुमच्या दैवरेषा उपटून तुह्मांला जयश्रीनं माळ घातलीन् तर? तर काय, काय ह्मणाल मग तुह्मी ? जनावरांना आणि लढवय्या शिपायांना उपास पडतातना? होय, पडूंदेत. पडू देत ते! प्रसंग पडल्यास हा भाऊ दाणावैरणीमुळं फांके पडणाऱ्या घोड्यांना आपली हाडं, आणि शिपायांना आपल्या अंगाच्या मांसाचा एकेक तुकडा चारील. पण उपासामुळं माघार आणि अपजय याचा मात्र नाही स्वीकार करणार." पा० १६६"भाऊ--कां ? कां मला उगीच आग्रह करतेस? या दुष्काळानं माझ्या सगळ्या सैन्याला रोज धडधडीत फांके पडताहेत, लढत्या शिपायांना घांसभर अन्न अथवा घोटभर पाणी मिळण्याची मुष्कील: जनावरांना वैरणीची काडी मिळेना; मग चंदी तर बाजूलाच राहिली; जनावरं अन् माणसं अन्नाविणं अन् पाण्याविणं पटापट प्राण टाकताहेत, हे सगळं हा भाऊ, धडधडीत बघत असतां, त्यानं खुशाल या पेढ्यावर, या बत्ताशावर, आणखी इतर या पदार्थावर यथास्थित हात मारून आपलं पोट भरावं, त्यापेक्षा त्यानं काळीज फाडून टाकतील असे भयंकर काटेकुटे अथवा कसली तरी भयंकर विषारी फळंमुळं खाऊन कां नव्हे ही खांच भरून काढू ? शिपायांना लढायला अवसान नाही, त्यांच्या मनगटांत समशेर नुसती हातांत धरण्याइतके देखील अवसान राहिलं नाही, घोड्यांच्या खंकाळण्यांत देखील पूवाचा जाम दिसत नाही, हे सगळं धडधडीत बघत असतां मी फराळ करूं? आजपर्यंत तुझा माझा इतका सहवास असतां अझूनपर्यंत तुला माझा स्वभाव कळू नये? हा भाऊ इतका नीच, इतका अधम, आणि इतकं अप्पलपोटेपणाचं कृत्य करणारा असेल असं तुला कसं वाटलं ? अथवा माझंच दैव फिरलं त्याला तूं तरी काय करशील : काय फराळ, फराळ करू." किराताच्या लेखनशैलीची कल्पना आमच्या वाचकांच्या मनांत नीट यावी येवढ्याकरतांच वरील उतारे द्यावे लागले. आतां गुणांच्या संबंधानें एक दोन किरकोळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट ही की, भाषा शुद्ध, गंभीर अशी असून शब्दरचना प्रत्येक रसास अनुकूळ अशी आहे. आणखा त्यांत नीतितत्त्वे किंवा व्यावहारिक नियम जागजागी ग्रथित केल्यामुळे तीस विशेषच शोभा आली आहे. अशा नियमाचे उदाहरण: "पण इथून तिथून सारी तापट मंडळी झटली झणजे अंत:क- ।