या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १९०१. रणाची फार कोमळ असतात. त्यांना डावपेंच वगैरे काहीएकपाहिती नसून ते आपल्यास जे ह्मणून कांहीं रास्त दिसत असेल तेच करतात. त्यांच्या हातून कोणाच्या अकल्याणाची अशी गोष्ट सहसा घडावयाची नाही." पान-३९-विश्वासरावाचे उद्गार. अशाच प्रकारची वरच्या उताऱ्यांत आलेली वचनें हीं जाड्या टाइपांत दाखल केलेली आहेतच. त्यावरूनही ती उत्तम प्रकारे कळण्यासारखी आहेत. दुसरे भाषेचे अलंकार झटले झणजे सुभाषित किंवा मणी हे होत. ह्यांची उदाहरणे:1 "एखादा निश्चय करण्यापूर्वीच विचार केलेला बरा." -पान ११"कागदाचे घोडे नाचवन अथवा आकडे मोडून त्यांच्या फोजा बनवून, जर मोहिम करतां येती तर बायकांना लग्नहि न करितां पिंपळाला नुसत्या प्रदक्षिणा घालून पोरं होती." -पान १३"जिथं प्राण तिथं कुडी. जिथं देव तिथं देऊळ." ENER -पान २५"त आपल्या शिकलगिरीच्या अटोकाट सफाईनं एखाद्या लाकडाच्या तलवारीलाहि अगदी पहिल्या प्रतीची पोलादी भासविताल! आणि अगदी उत्तम तलवारीला मातीमोल करतील!" STME -पान १४१अशा प्रकारच्या ह्मणी पदोपदीं गुंफलेल्या असल्यामुळे त्या पुष्पहारांत तुलसाच्या मजिऱ्यांप्रमाणे शोभन रसिक वर्गास आपल्या मधर परिमळानें प्रसन्न करून सोडतात. आतां गुणाच्या संबंधांत एकच गोष्ट कळवावयाची राहिली आहे. ती गोष्ट ही की, हे नाटक ज्या पात्रांचे अर्थात् लोकांचे आहे, त्या लोकांच्या झणज महाराष्ट्रीयांच्या त्या कालच्या समजुती प्रदर्शित करण्याची किंवा नमूद करून ठेवण्याची तन्हा ही होय. उदाहरणार्थ पुढे काही वाईट होणारे असले खणज दुःस्वप्ने पडणे इत्यादि, ह्याचेच दिग्दर्शन करण्यासाठी पुस्तककर्त्याने माऊसाहेबांस, त्यांचा पत्नीस दुःस्वप्ने पाडली आहेत. विश्वासरावाच्या पत्नीच्या खप्नामध्ये आनंदीबाईने तिचे मंगळसूत्र तोडले आहे. ह्यावरून 'मंगळसूत्र तुटण हे मराठ्यांच्या बायकांस केवढे अशुभ चिन्ह वाटते, व 'जें मनीं तें स्वप्नी' हीही झणं कशी प्रत्ययास येते, इत्यादिकांचा मनास बोध होतो. तसेंच भाऊ