या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. साहेब निघतांनाच कनातीस आग लागणे, बजीखानाच्या भिंतींतून पांचपंचवीस पिवळे पिवळे जर्द नाग बाहेर पडल्यावरून तेथे द्रव्य असावें असें अनुमान करणे, ह्यांत मराठी लोकांच्या समजुती व्यक्त होतात. ह्यांची किंमत कालांतराने फार कळून येत असते, किंवा अशा पुस्तकाचे भाषांतर कोणी परभाषेत केलें तर त्या लोकांस कळून येते. ह्या सर्वांचा विचार केला झणजे 'किराता'ने हाती घेतलेले काम उत्कृष्ट रीतीने बजावले, पुष्कळ बुद्धिमत्ता खर्ची घातली; वर्णनीय कौशल्य प्रगट केलें; व महाराष्ट्र भाषेमध्ये एका उत्तम नाटकाची भर घातली; ह्याबद्दल त्यांची पाठ थोपटणे जरूर आहे. आतां दोषस्थळांकडे वळू. परंतु सेतोषाची गोष्ट ही की, ह्या किराताच्या कृतींत बारीक नजरेने पाहिले तरी सुद्धा उपहासास्पद अशी दोषस्थळे नाहीत झटले तरी चालेल, तथापि वाटतात ती दाखल करणे इष्ट आहे. दोषांमध्ये पहिला दोष ह्मणजे लांबटपणा किंवा दीर्घसूत्रीपणा हा होय. हे नाटक ऐतिहासिक दृष्टया उत्तम आहे; व नाट्यशास्त्रदृष्टयाही निर्दोष आहे ही गोष्ट जरी खरी, तरी प्रत्यक्ष प्रयोग केल्यास मात्र तो लोकांचे मनोरंजक कितपत करील ह्याचा मोठाच संशय आहे. ह्याचे कारण, त्यांतील लांबच लांब प्रवेश व भाषणे. हा दोष नाटककर्त्यांच्या लक्ष्यांतही आल्यावांचून राहिला नाही, व तो होणे साहजिक आहे, असे त्याने प्रस्तावनेत सप्रमाण सिद्धही केले आहे. तें जितपत कबूल केले पाहिजे, तितपतच हेही पण कबूल केले पाहिजे की, ह्यांतील कित्येक प्रवेश व भाषणे त्यांतील रसभंग होऊ न देतां त्रोटक करतां आली असती. उदाहरणार्थ, जनकोजीस बळवंतराव मेहंदळे मलम सांगतात. ह्या मलमाचें कुतुबशहाच्या देहावर रूपक केले आहे. तो प्रवेश खरे झटले ह्मणजे अतिशय उत्कृष्ट आहे. पण तो थोडक्यांत मजेदार करतां आला असता. केवळ एका कोटीवर जनकोजीला चार पांच पाने चव्हाट संपेपर्यंत संशयांत राखणे किंवा त्याने राहणे हे त्याच्या अज्ञानाचे व पुस्तककांच्या चेंगटपणाचे द्योतक होतें ! तसेंच, विश्वासरावापाशी त्याच्या पत्नीने सांगितलेले भारूडही थोडेसें कमी करता आले असतें. भाऊसाहेबांनी आपल्या कुटुंबाशी केलेल्या फराळासंबंधी भाषणाचाही संक्षेप करता आला असता. कारण, त्याचा बहुतेक सारांश, त्याच प्रवेशांतील आरंभींच्या आत्मगत भाषणांत येऊन गेलेला आहे. अशा प्रकारचे बरेच प्रवेश त्रोटक करण्यासारखे आहेत, ते तसे केले असते तर, हा दोष पुष्कळ अंशी उडाला असता. कुतुबशहाला देहांत शिक्षा देतांना तर जणों काय बाजारच मांडला आहे. आणि त्याला मुळांत आधार असा