या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९८. २७१ आणि त्याने आपल्या कृतीने प्रतिबिंब किंवा प्रतिक्रिया उत्पन्न केली. ह्यालाच आपण स्वप्नज्ञान असें ह्मणतों. तर असें, जणों काय सांठवून ठेवल्याप्रमाणे सारे ज्ञान ज्या चक्रामध्ये राहिलेले असते, त्यासच 'मूलाधार'-ज्ञानकंद-किंवा मूलस्थान असें ह्मणतात. आणि क्रियांचें वेटाळून बसलेलें में ज्ञान-शक्ति–तीच वेटाळे घातलेली कुंडलिनी होय. हे बरेंच संभवनीय दिसते की, स्वयंचलित इंद्रियशक्तींचा सांठा ह्याच चक्रांत असला पाहिजे. कारण बाह्य पदार्थांचे पुष्कळसें चिंतन किंवा अभ्यास केला ह्मणजे मूलाधार चक्राजवळचा शरीराचा भाग ( माकडहाडाजवळ ) तप्त होतो. आतां ही वेटाळून बसलेली शक्ति जर जागृत केली आणि झपाट्याने कार्यास लावली आणि तिला मुद्दाम सुषुमेच्या नळीत ढकलली. आणि ती एकामागून एक चक्रे सर करीत गेली तर तींत विलक्षण प्रतिक्रिया सुरू होईल. ह्या क्रियाशक्तीचा एक लहान-अगदी क्षुल्लक अंश-जर ज्ञानतंतूंमध्ये शिरला, तरी सुद्धां चक्रांतून त्याची प्रतिक्रिया सुरू होते, आणि खप्न किंवा कल्पनातरंग उत्पन्न होतात. तर मग चिरतन अंतर्ध्यानसामर्थ्याने-अनंत जन्मींचा-जो ह्या शक्तीचा प्रचंड सांठा-समुद्र-त्याचा लोंढा जर सुषुमेंतून निघाला, आणि चक्रांवर आदळत चालला, तर त्याची क्रिया फार विलक्षण, खानाच्या आणि कल्पनेच्या प्रतिक्रियेहून पुष्कळ उच्च प्रतीची, साधारण ज्ञानाच्या प्रतिक्रियेपेक्षा अतिशय टिकाऊ-शाश्वतचीअशी होईल. अंतर्ज्ञान ते हेच. ह्याच स्थितीला मन पोंचलें झणजे तें ज्ञानसंपन्न किंवा ज्ञानमय झाले, असे ह्मणतात. आणि सर्व ज्ञानाच्या राजधानीचे शहर में मेंदू, तेथे जेव्हां ते पोंचते, तेव्हां जणों काय सारा मेंदू, जणों काय शरीरांतील प्रत्येक परमाणु, प्रतिक्रिया सुरू करतो, असे वाटते. आणि अखेरीस परमात्मज्ञानप्रकाशाची पूर्णदैदीप्यमान ज्वाला दिसू लागते. ही कुंडलिनी जेव्हां एका पाठीमागून एक चक्रे सर करीत जाते, तेव्हां जणों काय मनाचे पदर एकामागून एक उलगडत जाऊन योग्याला, सूक्ष्म व व्यक्त अशी विश्वाची दोन्हीही रूपें स्पष्ट दिसू लागतात. तेव्हां ज्ञान आणि प्रतिक्रिया ही जी ह्या विश्वाची दोन कारणें तींच केवळ यथातथ्य रीतीने कळू लाग