या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १९०१. कांहींच नाही. अशा पराजित व हताश झालेल्या वीराची अशी बचेरी करण्यांत भाऊसाहेबांचा पुरुषार्थ तो कोणता ? जखडून बांधलेल्या हतवीर्य पुरुषाच्या छातीत तरवार खुपसल्याने जनकोजीच्या पदरी 'किरातां'नी हलकेपणा मात्र बांधला ! ह्यापेक्षा दुसरे काही नाही. असो. गाव नमा दुसरा दोष हा की, कित्येक वाक्ये विशोभित झाली आहेत. मेहेंदळे भाअसाहेबांस सांगतातः-"कळलं का ह्मणून आणखी काय विचारतां !" ह्यामध्ये मर्यादाभंगाचा दोष येतो. भाऊसाहेब राघोबादादांस ह्मणतात:-"निलाजऱ्यासारखा शंभरदां काय विचारतोस ?" ह्यांत भाउसाहेब फारच जहाल गेले. विश्वासराव आपल्या पत्नीला ह्मणतात:-"तुझा हा विचार अगदी पोरकट आहे." येथे 'पोरकट' शब्द केवळ कर्णकटु होतो. "भुतावानी सारे रागू भाईर !' हे वाक्य अगदीच ग्राम्य-नव्हे गचाळ. उडद भाषा आहे ती कितपत शुद्ध व भारदस्त आहे हे आमच्याने सांगवत नाही. पण त्याचे जे भाषांतर दिले आहे, तें बरेंच ठिकाणी अपुरे आहे, व कित्येक ठिकाणी बरोबर साधलेलेही नाही. जनकोजीसारख्या मराठी सरदाराच्या तोंडी व बायकांच्या भाषणांत केवळ पंडितमन्य भाषा, व तत्त्वविचार घालणे हेही स्वभावसिद्ध गुणांच्या विरुद्धच होय. आतां तिसरा एक दोष आहे. त्याची गणना क्षुल्लकांत आहे. व त्याची जबाबदारी विशेषशी लेखकावर ठेवता येत नाही. तो दोष झणजे अक्षरांच्या चुका हा होय. कित्येक ठिकाणी दोन दोन चार चार अक्षरें अधिकच पडली आहेत. कित्येक ठिकाणी भलतीच अक्षरें व भलतेच विराम पडलेले आहेत. प्रश्नविरामांची तर अशी काही रेलचेल उडून गेली आहे की, पुसूं नये. आमच्या मते असे दोष न होण्याची खबरदारी लेखकापेक्षां छापखान्याने अधिक घेतली पाहिजे. मूळ लेखकाकडे जरी घुफै तपासायास गेलो, तरी ते काम त्याच्याकडून यथातथ्य रीतीने होत नाही. ह्याचे कारण, त्याने तो विषय प्रथम लिहिलेला असल्यामुळे त्याच्या मस्तकांत त्यांतील वाक्यें घुमत असतात. व ती त्यास बहुतेक मुखोद्गतच झाल्यासारखी असतात. ह्या मुळे 'ट' च्या ठिकाणी ' पडला असला तरी तो त्याच्या डोळ्याला पुन्हा पुन्हा 'ट' च दिसतो, अशी वस्तुस्थिति असल्यामुळे करेक्शनची जबाबदारी खरोखर छापखान्यावरच येते. आपण मालकाकडे पाठविलीं ह्मणजे आपण शुद्धाशुद्धाच्या जबाबदारीतून सुटलों,-ज्याचा दोष त्याच्या माथ्यावर-मग 'क'च्या ठिकाणी 'ब' पडला काय, हस्वाचे दीर्घ झाले काय, विराम उलट सुलट झाले