या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. काय, आली त्यापासून नामानिराळेच आहोत, असा छापखानेवाल्यांचा समज असेल तर तो चुकीचा समजला पाहिजे. इंग्रजी छापखान्यांत निदान एक तरी प्रूफकरेक्टर असतोच. आणि त्याच्यावर अतिशय जबाबदारी ठेवित असल्यामुळे, तो आपले काम अगदी डोळ्यांत तेल घालून करतो. ह्याचे प्रत्यंतर पहाणे असल्यास कोणतेही इंग्रजी पुस्तक घेऊन ते उघडून पहावें, हणजे त्यांत शपथेला सुद्धां चुकी आढळणार नाही. आणि आढळलेली कोणास खपणारही नाही. नाही तर आमची मराठी पुस्तकें ! जणों काय दारापुढे सांठलेला उकिरडा! मोठमोठ्या नामांकित छापखानेवाल्यांनी सुद्धा ह्याबद्दल कानाडोळा करावा, ही अत्यंत खेदाची गोष्ट होय. कित्येक छापखान्यांतून एडिटोरियल सदराबद्दल लांबलचक शेरे व प्रश्नांचे जुबाडेच्या मुंबाडे येऊन धडकतात, पण त्यांसच शुद्धाशुद्ध पाहणे हे आपले पहिले कर्तव्य ह्याची विस्मृति पडते. एडिटोरियल सदरापेक्षाही शुद्धाशुद्धाबद्दल आपणास जपले पाहिजे हे त्यांच्या ध्यानांत येत नाहींसें दिसते. ह्या सर्व गोष्टी लक्ष्यांत घेऊन ह्यापुढे तरी त्याबद्दल योग्य व्यवस्था होईल अशी आशा आहे. असो. वरील सर्व गुणदोषविवेचनावरून प्रस्तुत नाटकाचें-अर्थात्-पानिपतच्या दुर्दैवी मोहऱ्याचे स्वरूप कसे आहे हे वाचकांच्या ध्यानात येईलच. झणजे दोषांपेक्षां गुणांचा भाग त्यांत पुष्कळच पटीने अधिक आहे. येवढेच नव्हे, तर ऐतिहासिक नाटक शेक्सपीयरसारख्या धर्तीवर कसे लिहावे ह्याचा हा पहिलाच नमुना होय झटले तरी चालेल. ह्यांत पुष्कळच मार्मिकता दर्शविलेली आहे. आणि त्यावरून 'किराता'ने मराठी पुस्तकांमध्ये एका उत्तम ऐतिहासिक नाटकाची भर घातली, व प्रस्तावनेत केलेल्या विवेचनाबरहुकूम आपले काम उठवून दिले, ह्याबद्दल त्यांचे पुनरपि अभिनंदन करून हा लेख समाप्त करतो. पत्रव्यवहार. (सार्थ व सटीप ज्ञानेश्वरी अ०९ श्लो० ११ पान १९१ वरून) फटका. [श्री. रा. रा. गणपतराव माधवराव ऊर्फ अबासाहेब विंचूरकर, फर्स्ट क्लास सरदार व फर्स्ट क्लास माजिस्त्रेट यांजकडून:-10 ज्ञानराजकृत ज्ञानेश्वरिसम, प्रचंड सागरतीरं मला । अणुरेणुवत् गवसे कण तो कवनी गोवुनि आर्पियला ॥ध्रु०॥