या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १९०१. संसारातें भिउनि खरोखर, मद्रूपी तव हेतु जरी । नि विचार करुनी मनांत बा रे, सतत गोष्ट ही जतन करीं ॥ १ ॥ कावीळीनें व्याप्तदृष्टि तो, वदे चंद्रिका पिंवळि असे । को भल्याभल्यांना निर्मळ ऐशा, मद्रूपी की दोष दिसे ॥२॥ तापाने चव गेलि मुखाची, दुधासही कटु विष ह्मणतें । मनुष्य तेंवी नसतांही मी, मनुष्य मानिति मज जन ते ॥ ३ ॥ ह्याकरितां तुज पुनःपुन्हा की, हेच सांगणे धनंजया । कागती विसरूं नको हे स्थूलदृष्टिनें, बघेल सारें व्यर्थ तया ॥ ४ ॥ अमर होइना कोणि कधीही, अमृत पिउनी स्वप्नांत । स्थूलदृष्टिने बघतां मातें, व्यर्थ ठेविं बा चित्तांत ॥ ५ ॥ ओळखती मज महा मूर्ख ते, स्थलहष्टिने पाहनियां शामिल परंतु ओळख तीच खरोखर, ज्ञानाला ये आड तया ॥६॥ पडछाया ती नक्षत्रांची. रत्ने ही या आशेनें । र मनांत शिरुनी घातचि केला, हंसाचा त्या पूर्णपणे ॥ ७ ॥ गंगा समजुनि मृगजल जरि तें, गांठियलें तरि काय फळ | VERE कल्पतरूसम समजुनि घेतां बाभळ होते वायफळ ॥८॥ नीलमण्याचा हार समजुनी, सर्प धरावा हस्ताने । कारमा किंवा गारा वेंचुनि घ्याव्या, रत्ने जगुं या आशेनें ॥ ९ ॥ खैराचे वा इंगळ घ्यावे, पदरी ठेवा समजूनी । REF कूपी घाली सिंह उडी तो, साउलि अपुली नेणूनी ॥ १०॥था "मी"च काय तो प्रपंचांत या, निश्चय ज्यांनी हा केला । प्रतिबिंब जळांतिल चंद्रासाठी, धरणे व्यर्थचि यत्न भला ॥११॥ कांजी पिउनी पीयूषाचा, गुण येतो की काय अशी । bibaith वाट बघत जणुं बसणे जाणा, निष्फल की निज मनी तशी ॥ १२ ॥ हाच भरंवसा चित्ती धरुनी, बघती स्थूलाकार मला । दिसेन कैसा त्यांतें ह्मणती, नाशवंत अविनाशाला ॥ १३ ॥ पश्चिमसागरतीरी जाया, पूर्व दिशा का उचित असे | ETB TV किंवा धीरश्रेष्ठा, कोंडा, कांडुनि मिळतें धान्य कसें ॥ १४ ॥ स्थूलविकारित कळले जरि तरि, कळेल कां मद्रूप तया । फेंस सेवुनी होय तोष कां, होइल पाणी पिऊनियां ॥ १५ ॥