या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. मनोधर्ममोहानें पडती, भ्रमांत मानिति दृश्य मला। मानामा येथिल जन्मादिक जी कम, माझिंच हा तद्धेतु खुला ॥ १६ ॥ अशा रीतिने नामरहित मी, असतां देती मज नाम । माजल कर्मरहित मी असतां तेंवी, वदती आहे मज कर्म ॥ १७ ॥ मी विदेही असुनि खरोखर, देहधर्म मज आहे वदती । स्थूलदृष्टिने बघती ते हे, अरोप लादिति मजवरती ॥ १८ ॥ निराकार तरि अकार आहे, निरुपाधी तरि उपचार । itema कर्तव्याकर्तव्यरहित मज, अचार सर्वही व्यवहार ॥ १९ ॥ वर्णहीन तरि वर्ण मला की, गुणातीत मज गुण सारे। चरणरहित की हस्तरहित मी, असतां तेही असति बरे ॥ २० ॥ शेजेमाजी वनावलोकन, करितो जैसा निद्रिस्त । अमितामित मज ठायिं च बघती, संचारी मी सर्वत्र ॥ २१ ॥ कर्ण नेत्र की गोत्रहीन मी, कर्ण नेत्र ते गोत्र मला । निराकार अव्यक्त मजसि ही, व्यक्ति तशी आकार भला ॥ २२ ॥ दुःखहीन मी असतां आहे, दुःख मला हा समज असे । ETD नित्य तृप्त मी असतां मानिति, मजमध्ये की तृप्ति वसे ॥ २३ ॥ आच्छादन मज नसतां मजला, वदती आहे पांघरुण । - सर्व कारणां कारण मी ही, भूषणातीता भूषण ॥ २४ ॥ सहज अशा मज नवा बनवुनी, स्वयंभु असतां स्थापियती । शाश्वत असतां आवाहन ते, विसर्जनादिक विधि करिती ॥ २५ ॥ सदा सर्वदा स्वतःसिद्ध मी, एकरूप की असतांना ।। शिशुत्व यौवन मानिति मजला, आहे की तो वृद्धपणा ॥ २६ ॥ अद्वैतातें ह्मणति वेगळा, अकातें कर्म तसें । अभोक्ता मी भोग भोगितों, ह्मणती किति जन मला असे ॥ २७ ॥ मला मुळी कुळ नसे तरी तें, मत्कुल वर्णन करिति जनीं । नित्य असुनि मी मन्नाशानें, होती जन ते कष्टि मनीं ॥ २८॥ 'मी तों सर्वां समान असतां, वदती शत्रू मित्र मला । अणुरेणुवत् गवसे कण तो, कवनी गोवुनि अर्पियला ॥ २९ ॥ निजानंदि मी निमग्न असतां, बहू सुखेच्छा मला असे | PIN सर्वां भूती मत्समता ती, एकदेशि हे वदति तसे ॥ ३०॥