या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १९०१. चराचरी मी नित्य राहतों, आत्मस्वरूप होऊनी MIRMATION असे दुजेपण मजमध्ये की, अशी उठविती कंडि जनीं ॥ ३१ ॥ मायेपासुनि झालेलें जें, मनुजधर्म मी तोच असे । अशा प्रकारे किंबहुना हे, सारे उलटें ज्ञान दिसे ॥ ३२ ॥ iny आकृति पाहुनि देव असे ही, धरुनि भावना त्या भजती । ne होता आकृति नाश पावला, अंत देव की जन झणती ॥ ३३ ॥HED अशा प्रकारे मनुजाकृति मी, आहे समजति जन मजला । ह्मणुनि ज्ञानचि करुनि सोडितें, अंधचि तैसें ज्ञानाला ॥ ३४ ॥ ज्ञानराजकृत ज्ञानेश्वरिसम, प्रचंडसागरतीरिं मला । अणुरेणुवत् गवसे कण तो, कवनी गोवुनि अर्पियला ॥ ३५ ॥ विंचूरकर, ता. २५-१-१९०१. गणपतराव माधवराव विंचूरकर. O nion श्रीरस्तु गुरुवर्य राजमान्यराजश्री एडिटर केरळकोकिळ, मु० मुंबई यांसः मकरसंक्रांतीची भेट.NET वसंततिलका. संक्रांतिचा समुदया दिन आज आला । जो सौख्यपर्व गमला सकलां जनांला ॥ हात्तवात जनवृंद विलग्न सारा । वेळी अशा न सुचतो दुसरा पसारा ॥ १॥ नानापरी मधुर भोजन आटपून । वस्त्रोत्तमें सुरुचिराभरणे नटून ॥ पात्रांत गोड तिळगूळ भरोनि त्यास । चाले जनौघ सुहृदां वितरावयास ॥ २॥ अपोनियां गुरुजनां नमिती पदास । आधी शिरीं धरिति तत्-शिवदाशिवास ॥ भेटोनि अर्पिति तिला सुहृदास भावें । त्या प्रार्थिती "मधुर बोलत नित्य जावें॥३॥ मी ही अशा सुसमयीं मनिं फार धालों । पूज्यां करूं तिलसमर्पण सिद्ध झालों ॥ सप्रेम पूज्य पितृपादसरोरुहातें । वंदोनियां मग समर्पितसे तिलांतें ॥ ४ ॥ आशीर्वचास वरितां जरि हर्ष झाला । हा हाय ! खेदद विचार मनांत आला ॥ "आह्मां सुतांवरि जिची अनिवार माया। लोकी नसे समयिं या जननी नमाया" ॥५॥ झाली गुरुस्मति विचार लयास गेले । ज्यांनी मना क्षण सकष्ट खरेच केले ॥ "आतां घडेल गुरुदर्शन' हा विचार । उल्हास दे मम मनाप्रत की अपार॥६॥