या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. मुंबापुरी इथुनि ती जरि दूर फार । केला गुरो ! द्रुत "मनोरथ" मी तयार ! ॥ त्या कल्पनाहय जुपून बसोनि आंत । आलों जवें गुरुपदाजवळ क्षणांत ॥ ७ ॥ मी वंदितों गुरुवरा ! पदपंकजातें । यद्दर्शने भजकविघ्न लयास जातें ॥ पाहोनि पूज्य गुरुपाद हिमांशु हर्षे । चित्ताब्धि सौख्यभरतें वरि हा प्रकर्षे ॥८॥ आतां सभक्तिसितचित्त तिलें भरोन । हे काव्य पात्र विनयें चरणा स्मरोन । मी अर्पितों जरि कराल तदंगिकार । मानीन मी मज गुरो ! तरि धन्य फार ॥९॥ शिष्यास मुख्य गुरु दैवत या जगांत । नौका गुरु स्वभजकास भवार्णवांत ॥ जाणोनि ये शरण मी मज मार्ग दावा । आतां बरा सदुपदेश मला वदावा॥१०॥ "मी कोण ? कोठुनि कशास्तव येथ आलों? । ही इंद्रियें वरुनि सज्ज कशास झालों ॥ कर्तव्य काय मज येथ करावयाचें । अंती कुठे मजसि येथुनि जावयाचे" ११ शंका अशा गुरुवरा! उठतात चित्तीं । मी मंदबुद्धि मज होय न तन्निवृत्ति ! ॥ ज्या ऐकतां मम मतिभ्रम सर्व जावा । ज्ञानोपदेश असला मजला वदावा ॥१२॥ माझ्या मनांत गुरुभक्ति सदा असावी । सत्साधुसंतभजनांत तनू कसावी ॥ कर्तव्यमार्ग मजला अवघा कळावा । संसारमोह अतिदुस्तर आकळावा ॥ १३ ।। मद्विस्मृती गुरुमना न कधी पडावी । ऐसीच भेट अपुली मजला घडावी ॥ विश्वेशनामजप मद्वदनीं भरावा । चित्तास शांति मिळुनी भव हा तरावा ॥१४॥ बंधवादि पूज्य सुहृदां तिल अर्पण्यास । जाणे असे मजसि मद्वसतिस्थलास ॥ आतां गुरो मज निरोप असो दयाला ! । मत्प्रार्थना द्रुत वरो शुभ सत्फलाला॥१५॥ ता. क०-आपल्या कविता व वेळोवेळी आपण केलेला उपदेश याने का वितारचनास मला मोठा उपयोग झाला असल्याने मी आपणांस गुरुस्थान कल्पिले आहे. ज्ञानेश्वरीवाचन चालू, पोतकांस नमस्कार! कलीचा दरबार अपुराच राहिला ? मत्तमदनमातंग परें केव्हां.१ पत्रोत्तर कवितारूपाने यावें ही इच्छा ! कारण ती रचना शिष्यास प्रतिभेट होईल! आपण सर्वत्र क्षेम ? तूर्त मुक्काम ? कमजास्त कळवालच ! कृपा असावी, यापरतें मागणें नाही. ही वि. मु० कल्लोळ १३-१-१९०१. आपला नम्र-विष्ण बाबाजी कुळकणी. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI आशा DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.