या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु० १५] [अं०४ साप गिळणारा साप. AOS000 RECOOM CRORAN AAPP 06.010 VAIDYA 'जीवो जीवस्य जीवनम्' हे वाक्य व त्याचा अनुभव हा सर्वविश्रुतच आहे. लहान लहान जीवांवर निर्वाह करणारे मोठमोठाले प्राणी भूचरांमध्ये, जलचरांमध्ये अनेक आहेत. लांडगे, वाघ मेंढराना व हरणाना खातात हे आपण पहातों. तथापि स्वजातीयांनाच खाणारे प्राणी सुद्धा काही कमी नाहीत. मोठे मासे लहान माशांना गिळतात; ससाणे वगैरे हिंसक पक्षी लहान सहान चिमण्यासारखी पाखरें खातात ही आपल्या दृष्टीस पडते. ही गोष्ट जरी खरी आहे, तरी साधारणपणे आकाराने बरोबरीच्याच स्वजातीय प्राण्यास स्वजातीय प्राण्यानेच भक्षण करावे, हे मोठे चमत्कारिक आहे. पण तसेंही घडतांना कचित् प्रसंगी आढळतें ह्यांत शंका नाही. मोठा साप, साधारणपणे बरोबरीच्या-हणजे आपल्यापेक्षा आकाराने किंचित् लहान-अशा सापास गिळत असल्याची उदाहरणे बऱ्याच लोकांनी पाहिलेली आहेत. पण आज जे आह्मी उदाहरण देत आहों, ते फार लोकविलक्षण आहे. ह्मणजे ह्या उदाहरणांत एका सापाने दुसऱ्या सापास गिळलें आहे येवढेच नव्हे, तर तो पोटांत गेलेला साप गिळणान्या सापाचे पोट फोडून बाहेर निघाला आहे! ही