या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. गोष्ट अश्रुतपूर्व आहे ह्यांत शंका नाही. ह्यास्तव हा चमत्कार कोठे घडला त्याबद्दलची थोडीशी माहिती देतो. ह्या दोन चमत्कारिक सापांची फोटोवरून तयार केलेली चित्रे शिरोभागी दिलींच आहेत. हे सापाने साप गिळण्याचे अपूर्व उदाहरण अमेरिकेंत घडलेले आहे. अमेरिकेतील कानडा देश थंडीविषयी प्रसिद्धच आहे. ह्या देशांत कॉलिन्सबाय ह्मणून एक गांव आहे. त्याच्या जवळच मिस्टर जॉन फिल्मर ह्या नांवाच्या एका गृहस्थांनी एक मोठे कुरण खरेदी घेतलेले आहे. त्या आपल्या कुरणांत सुमारे सात वर्षांपूर्वी ते एके दिवशी भांगलीत असतां, त्यांस हा चमत्कार दृष्टीस पडला. प्रथमतः एका मोठ्या सापास दुसरा साप गिळित आहे, येवढेंच दृष्टीस पडले. ह्यास्तव त्यांनी जवळ असणाऱ्या काही लोकांस ती मौज पाहण्याकरितां मुद्दाम जवळ बोलावून आणले. सर्व मंडळी पाहत आहेत, तों तेथें दुसराच एक चमत्कार दृष्टीस पडला. तो असा की त्या पोटांत गेलेल्या सापाने दुसन्या सापाची कूस मध्येच फोडून त्यांतून हळच आपले डोकें बाहेर काढले व ह्मणतां ह्मणतां तो वीत दीडवीत बाहेर पडला. तेव्हां ह्या नव्या चमत्काराविषयीं तर कोणाची कांहींच कल्पना चालेना. कारण, कोणत्याही सापाला भोक पाडतां येणे अशक्य; आणि त्यांतून पोटांत गेलेल्या सापाला तर ते मुळीच पाडता येणार नाही. तेव्हां पहिल्या सापाच्या कुशीला भोंक पडले कसे? ह्याचे तेथे जमलेल्या मंडळीस मोठे कोडेच पडले. त्यावर पुष्कळ भवति न भवति होऊन त्यांनी अखेर असा निश्चय केला की, भांगलण करतांना त्या गिळणाऱ्या सापाच्या पोटाला खुरपे लागून लहानसें भोंक पडले असावे. व त्यांतच दुसऱ्या सापाने आपले डोके खुपसून आपल्या आंगच्या जोरानें तेच भोंक मोठं करून तो बाहेर पडला असावा. हे दोन्ही साप जिवंत होते. व त्यांचा लागलीच तेथील मंडळीने फोटो घेतला. तो जशाचा तसा वर दिला आहे. गिळणारा साप कौडक्या जातीचा होता. व पोटांत गेलेली धामण होती. कोणत्याही प्राण्याचे संरक्षण करावयाचें परमेश्वराच्या मनांत आले झणजे तो कसा व कोणत्या त-हेनें करील, व कोणत्या बाजूने मार्ग दाखवून देईल, ही गोष्ट मनुष्यप्राण्याच्या तर्काबाहेर आहे !!