या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रील १९०१. पुस्तकपरीक्षा. आमच्यांतील कवयित्रींची एक जोडी. कित्येक तत्त्वे निराकार असूनही ती व्यक्त स्वरूपास येतात. आणि त्यांच्या त्या स्वरूपांचा ठसा ह्या जगावर कितीएक काल, कितीएक दिवस-कितीएक वर्षे-नव्हे कितीएक युगें सुद्धा जशाचा तसा राहतो. हे आह्मां मानवांचे मोठे भाग्य आहे. परमात्मा, आत्मा, आणि अंतःकरण ही तिन्ही तत्त्वे निगुण असूनही सगुणरूपाने उदयास येतात. सृष्टि हे परमेश्वराचें व्यक्तस्वरूप होय; देह हे आत्म्याचे व्यक्त स्वरूप होय; आणि वाङ्मय हे अंतःकरणाचें व्यक्त स्वरूप होय. झाडाच्या कोमल पल्लवांवरून, घनदाट व गार छायेवरून, रसाळ व मनमोहक फलपुष्पांवरून बीजाचे महत्व व गुणधर्म समजतात, आणि त्याची महती मनांत बिबते. जगामध्ये जितकी जितकी ह्मणून काव्ये आहेत, तितकी तितकी निरनिराळ्या कवींच्या अंत:करणांची व्यक्त स्वरूपें किंवा चित्रे होत. तेव्हां अर्थात्च ही काव्यचित्रे जितकी जितकी रमणीय व उठावदार असतील, तितका तितका त्या कवीविषयी त्याच्या स्थितीविषयीं-त्याच्या अंतःकरणाविषयीं पूज्य भाव व आदर उत्पन्न होणे साहजिकच आहे. पुष्पे झटली की ती बहुधा सारी मनोल्हादक व कोमल असावयाची हें खरें; तथापि त्यांतही गुलाब, जाई, पारिजातक अशा नसांगक सुकुमार व नाजुक फुलांकडे पाहिले झणजे मन फारच प्रसन्न होतें. काव्याची गोष्टही काही अंशी तशीच आहे. काव्य गोजिरवाणे असले झणजे त्या कवीविषयी व त्याच्या काव्याविषयी पूज्यबुद्धि उत्पन्न होतेच होते. आणि त्यांतही तें कवयित्रीचें केवल अबलेचें-असलें ह्मणजे त्याबद्दल विशेष आदर उत्पन्न व्हावा हे मनुष्यस्वभावास अनुसरूनच आहे. आणखी ती स्त्री केवळ साधीभोळी; ईश्वरभक्तिपरायण, विद्यालयाचा वगैरे संस्कारही न झालेली; अल्पवयस्क; आणि अल्पायुषी! अशी असेल, तर तिच्या करुणास्पद स्थितीबद्दल, गुणांबद्दल, सौजन्याबद्दल, अपूर्व कृतीबद्दल, अंत:करणास पाझर फुटावा, तिच्या अनुपम कृतीचे कौतुक वाटावें, तिच्या शब्दलालित्याने आश्चर्यचकित व्हावें, व स्या बुद्धिमतीच्या ठिकाणी अत्यंत पूज्यभाव उत्पन्न व्हावा अगदी साहजिकच आहे. आणि अशा कोमल कृति कोकिळापुढे येणे हेही एकपरी त्याचे सुदैवच समजले पाहिजे, अशा दोन कृति लागोपाठ आज आह्मांपुढे आल्या आहेत.