या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें, त्यांची समालोचना आही एकेच ठिकाणी करित आहों. कारण, ती दोन्हीं उदाहरणे अगदी समसमान आहेत हटले तरी चालेल. दोन्ही कवयित्रींच्या कतीबरोबरच त्यांची चरित्रेही ध्यानात ठेवण्यासारखी आहेत. ह्यास्तव क्रमानेच त्यांचे अभिनंदन करणे योग्य दिसतें, SERIE प्रासादिक पद्यावली-ही स्वर्गवासिनी सौ० सावित्रीबाई केळकर ह्यांनी रचिली, व त्यांचे प्रिय पती रा. रा. बाळकृष्ण रामचंद्र केळकरह्यांनी श्रेष्टी क्षेमराज श्रीकृष्णदासजी ह्यांच्या प्रसिद्ध "श्रीवेंकटेश्वर" स्टीमप्रेसमध्ये छापून ती प्रसिद्ध केली आहे. खरोखर ह्या महासाध्वी व सुकुमार कवयित्रीचे अल्पस्वल्प तरी चरित्र देणे जरूर होते. परंतु त्यांनी तिच्या आंगच्या काही ठळक ठळक गुणांशिवाय इतर माहिती कांहींच दिली नाही ह्मटले तरी चालेल. तथापि त्यांस द्वितीयावृत्ति लौकरच काढावयाची आहे, ह्याकरितां तींत तरी ते त्यांनी अवश्य घालण्याची तजवीज ठेवावी, अशी आमची सूचना आहे. ह्या कवयित्रीचे जीवनचरित्र ह्यांत कांहींच ज्या अर्थी नाही, त्या अर्थी तिचा जन्मशक वगैरे समजण्यास काही मार्ग नाही हे उघड आहे. तथापि सदरहू पद्यांवरून व त्यांच्या अल्प प्रस्तावनेवरून जी तिची थोडी माहिती देण्यासारखी आहे, तेवढी देऊन नंतर तिच्या कृतीबद्दल दोन शब्द बोलूं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुळ्याच्या गणपतीचे स्थान सुप्रसिद्धच आहे. तेथे रघुवीर शास्त्री भिडे ह्या नावाचे एक प्रसिद्ध गृहस्थ असून ते मोठे धार्मिक, सत्वशील व आचारविचाराने निर्मल आहेत. सौ० सावित्रीबाई-हणजे प्रस्तुत पद्यांची कवयित्री-हे त्यांचे कन्यारत्न होय, तेव्हां त्यांसही लहानपणापासूनच घरांतील वळण लागून त्या सुशील झाल्या होत्या हे सांगणे नकोच. देवांस नमस्कार करणे, त्यांची पूजा करणे, त्यांची स्तोत्रे ह्मणणे हे सर्व त्यांच्या बाळपणाच्या खेळापासूनच सुरू झाले होते. त्यांच्या बाळपणापासून त्यास आपल्या पित्याच्या तोंडच्या भक्तिपर कथा व पुराणे ऐकण्याची गोडी लागली. त्यांचे माहेरचें नांव बया असे होते. नंतर त्या उपवर झाल्या, तेव्हां त्यांचे रा. बाळकृष्णपंत केळकर ह्यांच्याशी लग्न झालें. केळकर हे आज कितीएक वर्षे प्रसिद्ध 'श्रीवेंकटेश्वर' छापखान्यांत प्रुफ करेक्टरचें-ह्मणजे संशोधनाचे काम दक्षतेने करीत आहेत. हेही गृहस्थ मोठे सभ्य, सत्वस्थ, रसिक व सज्जनांचे चहाते असून मोठे पाणीदार आहेत. त्यांची स्वधर्मावर मोठी निष्ठा आहे. त्यांच्या मागे काम फार असते. तथापि त्यांतूनही जो थोडाबहत वेळ त्यांच्या