या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रील १९०१. बट्यास येतो, त्यांत ते स्नानसंध्या व पूजाअर्चा इत्यादि सत्कर्मे मनोभावानें कतात. अशा गृहस्थांशीच सावित्रीबाई ह्यांचे लग्न झाल्यामुळे 'समानशीलव्यसनेषु सख्यं' ह्या न्यायानेच दुधांत साखर पडली. आळंदीचे प्रसिद्ध सायुवर्य नृसिंह सरस्वतीस्वामी हे त्या उभयतांनी गुरुस्थानी मानले होते. रा. केळकर ह्यांचे मूळ ठिकाण मालगुंड, हे गांव सावित्रीबाईचे माहेरस्थान जो 'पुळ्याचा गणपति' त्याच्या अगदी जवळच होते. त्यामुळे सावित्रीबाईंना लहान वयांत वारंवार माहेरी जावयास सांपडून तेथील त्यांच्या आवडत्या देवाचें दर्शन घडे. तेथील श्रीगणपतीवर त्यांची केवळ निस्सीम भक्ति होती. पुळ्याच्या गणपतीचे स्थान फारच प्रसिद्ध, पुरातन व रमणीय असे आहे. आणि अशा ठिकाणी सुकुमार मन बालपणापासूनच जडले, तर त्या भक्तीला दुसरी उपमा वी कशाची? त्याप्रमाणेच सावित्रीबाईची अवस्था होती. त्या माहेरी गेल्या रणज त्या विघ्नेश्वरावांचून दुसरा छंदच नसे. त्या अहोरात्र त्याची भक्तिभावान तात्र पठण करीत बसत; व आपल्या बोबड्या बोलाने काही नवीही रचित. पुढत्या वयात आल्यावर बाळकृष्णपंतांच्या सहवासांत राहूं लागल्या. त्याच आपल्या पतीवर अत्यंत एकनिष्ठ असे प्रेम होतें; व पतीलाही ती साध्वी प्राणाहून प्यार होती. ह्यामुळे त्या दंपत्यांतील संसारसुख फार अप्रतिम असे. परंतु परमेश्वरान ते भोगावयास त्यांस फार दिवस दिले नाही, ही मोठी दुर्दैवाचा गाष्ट होय! सौ० सावित्रीबाई स्वभावाने फारच नम्न असून ईश्वरभक्ति तर त्यांच्या नखशिखांत खिळलेली होती. त्यामुळे त्यांच्या खऱ्या अंतःकरणाचा ज्यास पारख नव्हती, त्यांस त्या वेडगळशा दिसत. त्यांच्या स्वभावाची खरी थोरवी, त्यांच्या पतीसच काय ती माहित होती. त्या आपल्या संसाराचे काम उरकलं की, ईश्वरस्तुतिपर कवनें करीत बसत. त्यांस लिहावयाला पूर्वीच येत होते, किंवा केळकरांनी त्यांस शिकविलें, ह्याची आमांस माहिती नाही. तरी त्यांच्या मूळ लेखाच्या ज्या थोड्याबहुत प्रति केळकरांनी आझांस दाखविल्या, त्यावरून त्यांच्या उद्योगाबद्दल व ईश्वरप्रेमाबद्दल फारच कौतुक वाटले. त्यांनी कितीतरी कविता केलेल्या आहेत. आणि त्या पुष्कळ अंशी शुद्ध असून त्यांतील प्रौढ व कोमल शब्दरचना पाहून कोणासही आनंद झाल्यावाचून राहणार नाही. प्रस्तुतची 'प्रासादिक पद्यावली'ही त्यांच्या कृतींतील अत्यल्पांश आहे. येवढे सांगितलें झणजे त्या बालवयस्क कवयित्रीच्या अंतःकरणाची कल्पना करण्यास पुरे आहे. अशी सुशील व सद्गुणी पत्नी निवर्तल्याबद्दल रा. केळकर