या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. यांस दुर्निवार दुःख व्हावें हे अगदी स्वाभाविकच आहे. ह्या कवयित्रीचें देहावसान होऊन नुकतेच एक वर्ष झाले. तिच्या विरहानीने रा. केळकर निखालस होरपळून गेले आहेत; व ते अगदी तरुणावस्थेत असतांही त्यांचा द्वितीय विवाह न करण्याचा (निदान आज मितीस तरी) निश्चय आहे. त्यांच्या पत्नीप्रेमाचे दर्शक ह्मणून त्यांच्या प्रस्तावनेतील थोडासा लेख येथे सादर करतो: "विद्या आणि साधुता ह्या दोन्ही गुणांनी ज्या स्त्रीच्या हृदयमंदिरांत निवास केला, तेथील सौभाग्य अवर्णनीय आहे. अशी स्त्री प्राप्त झाल्यावर तारुण्यावस्थेमध्ये तिच्या वियोगाचा दुःखद प्रसंग तिचे पतीवर येणे झणजे त्याचे खडतर दुर्भाग्य समजले पाहिजे, आणि त्याच्यासारखा संसारामध्ये कोणीही दुःखी नाही. साध्वी सती प्राणप्रिय सौभाग्यविजयी सावित्रीबाई केळकर हिच्या स्वर्गवासामुळे, मला जें दुःख झाले आहे ते माझ्या देहाबरोबर जाणार, विशेष दुःख इतकेंच की, ती अल्पवयी होऊन सांप्रतच्या स्त्रियांमध्ये एक नमुना होती. यद्यपि तिचा विद्याव्यासंग मुळीच नव्हता, तथापि तिने रचलेली पदें या गोष्टीला प्रमाणित करतात की, तिच्या मनामध्ये ईश्वरी भक्तीने जागृत वास केला होता. हा सर्व श्रीगजाननाच्या पूर्णानुकंपेचाच प्रताप आहे. तिने रचलेली ईश्वरस्तुतीवर 'प्रासादिक पद्यावली' यथाप्रत मुद्रित करून व हेच तिचे स्मारक मानून प्रिय आत इष्टमित्रांना भेट करीत आहे, आणि तिला आपल्या दुःखित हृदयांत स्थान देण्यापासूनच मला शांति आहे." ह्या तिच्या प्राणप्रिय पतीच्या दुःखाच्या उसळीच्या उद्गारावरून प्रस्तुत कव. यित्रीचे हृदय व्यक्त होते. रा. केळकर हे ज्या मुद्रालयांत असतात, तेथे सर्व हिंदुस्थानी भाषेचा व संस्कृत भाषेचाच आज कितीएक वर्षे त्यांस व्यासंग असल्यामुळे, मराठी भाषा त्यांस तितकी परिचित नाही. पण संस्कृत पद्यरचनेत त्यांची चांगली गति आहे. तीही वाचकांस कळावी, व त्यांचे दुःखोद्गारही अधिक व्यक्त व्हावेत, ह्याकरितां त्यांतील थोडी पद्येही आमच्याने दिल्यावांचून राहवत नाहीत. ती पर्ये ही: व आयो. श्रीगुरुनृसिंहवाणी पाणी संधाय शश्वदुपनम्य । अधुनेदमेव याचे सार्या भार्या भवद्भिरुपकार्या ॥ १॥ महतो भाग्याल्लुब्धा सा तन्वी हा विहाय दीनं माम् । आयासीद्भवदन्तिकमुपलब्धं किंतु तारकं मन्त्रम् ॥ २ ॥