या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रील १९०१. तस्याः पवित्र आत्मा शान्तिसुखं संततं समभ्येतु ॥ ३ ॥ ह्यावरून केळकर यांच्या पत्नीप्रेमाची ही उत्तम साक्ष पटते. असो, आतां 'प्रा । हे लहानसें पुस्तक सुमारे ३० पेजांचे असून त्यामध्ये तितकीच सुमारे पर्दे आहेत. सुंदर सुंदर देवादिकांचे सात आठ कट आहेत. प्रारंभीच श्रीसद्गुरु नृसिंहसरस्वती महाराज ह्यांची हाफ साइजची कोरीव तसबीर दिलेली आहे. छपाईचे काम फारच नमुनेबाज असल्यामुळे "श्रीवेंकटेश्वर" स्टीमप्रेसची तारिफ करणे जरूर दिसते. हा बाह्यांगाचा विचार झाला. आतां आंतील का. व्यगुणासंबंधाचा विचार राहिला. गुणाच्या संबंधानें मुख्य अंगें झटलीं ह्मणजे कविता सरळ, साधी व बहुतेक शुद्ध असून त्यांत भक्तिरस तुडुंबलेला दिसतो. पुळ्याच्या गणपतीच्या प्रदक्षिणेमध्ये सृष्टिवर्णन फारच रम्य केले आहे. कवयित्रीची भक्ति जशी पुळ्याच्या गणपतीवर होती, तशीच ती इतर देवतांवरही होती, असे निरनिराळ्या देवतांच्या स्तवनावरून उघड होते. आतां क्वचित् | ठिकाणी अल्पस्वल्प दोष आहेत हे खरे, पण ते त्या बालवयस्क युवतीच्या भक्तिमय कृतीला उलट भूषणभूतच होऊन, तिच्या कोमल अंत:करणाचे व दीघांद्योगाचे कौतुकच वाटते, हणन प्रस्तुत पद्यांतील कांहीं पये येथे देणे अवश्य वाटतात. खालील पद्य रा. पाटणकरांच्या नाटकांतील "राम स्मरावा राम" ह्या चालीवर आहे. तें असें: धरि मनुजा दृढ आस सदोदित, सुमुखभजनी आस ॥ध्रु०॥ शुंडामंडित शूर्पकर्ण तो, तोडिल की भवपाश स०, सु० ॥ मायेपासुनि अलिप्त राहे, भक्तहृदयिं करि वास स०, सु० ॥ श्रीगणपतिचा अगाध महिमा, न वर्णवे शेषास स०, सु० ॥ शक्रादिक हे भुंग होउनी, रुंजति पदकमलास स०, सु० ॥ना पद ( भजनी चाल.) जयजय कंसारी कंसारी । राधारमण मुरारी ॥ जयजय० ॥ उभा राहुन यमुनेतीरीं । सांवळा नन्द गोधनें चारी ॥ जय० ॥