या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. मुरली वाजवी मधुरस्वरी । सांवळा भुलवि गोपिका नारी ॥ज०॥ सुदामा विप्र जन्मभिकारी । तयासी दिधली सुदामपुरी ॥ ज० ॥ भक्तसंकटी पडतां भारी । धांवे दीनांचा कैवारी ॥ ज० ॥ मन्दमती या सावित्रीला । प्रभु तो बोलवि मधुरस्वरी ॥ ज० ॥ आतां कांही अभंगाचा मासलाःWआले सोयरे पाहुणे ॥ त्याचा करिती सन्मान ॥ जवळि पैसा नाही जाण ॥ काढिती घरोघरी ऋण ॥ नाही ह्मणतां हात जोडी ॥ ह्मणे लाज राखा एवढी ॥ केली परोपरी पक्वान्ने ॥ सोयरे बैसले भोजना ॥ हात जोडुनी विनविती ॥ भोजन करावे स्वस्थचित्तीं ॥ अतीत मागू आला अन्न ॥ त्यासि देती झिडकारून ॥ एवढी झाली अपकीर्ती ॥ त्याचि लाज नाही चित्तीं ॥ अतीत विन्मुख तो गेला ॥ देव त्यावरी कोपला ॥ बया ह्मणे संसारांत ॥ गढ़न गेले ज्याचें चित्त ॥ त्यासि कैसा हो परमार्थ ॥ साधुसंतां अव्हेरित ॥ २॥ 'शितावरून भाताची परीक्षा' ह्या न्यायाने प्रस्तुत कवयित्रीच्या काव्यगुणाचें मोल बरेच कळून येण्यासारखे आहे. आणि त्यावरून 'यमाजिभास्कर जयां वदतात लोक' अशा बेचव कविता करणाऱ्या अर्ध्या हळखंडाने पिवळ्या झालेल्या कवींनी अथवा 'किवा सकल साधुची..........' अशा विद्वान् कविपुंगवांनी सुद्धां खालीं माना घातल्या पाहिजेत. आमच्या नूतन कविमंडळाने साध्या व सोप्या कविता करण्याचा ह्या कवयित्रीसारखा गुण उचलला तरी पुष्कळ होईल, पण विद्वत्तेच्या घमंडींत 'धड ऐल तीर ना पैलतीर' अशी त्यांची अवस्था होते. असो. एकंदरीत सदरहु 'प्रासादिक पद्यावली' ही मनाची उदासीनता घालविण्याच्या कामी, व क्षणभर परमार्थाची जागृति देण्याच्या कामी एक चांगले साधन आहे. व रा. केळकर कवयित्रीचे कांही स्मारक ह्मणून तिच्या आवडत्या दैवताच्या स्थानी करणार आहेत. ह्याकरितां सदरहु अल्पमोली व बहुगुणी पुस्तकास रसिक व गुणग्राहक लोकांनी आश्रय देऊन 'एक पंथ और दो काज' साधण्याची संधि घालवू नये अशी.. आही सविनय सूचना करून दुसरीकडे वळतों,