या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रील १९०१. संगीत सीताशुद्धि-हें नाटक कै० सौ० काशीबाई-रावसाहेब बळवंत रामचंद्र सहस्रबुद्धे बी. ए. एज्युकेशनल इन्स्पेक्टर, दक्षिणभाग, यांची कन्या-ह्यांनी लिहिले आहे. ह्या बाल कवयित्रीचा वृत्तांतही मोठा चमत्कारिक आणि अत्यंत करुणास्पद आहे. सौ० काशीबाईनी स्वहस्तें जशी ह्या नाटकाची मूळ प्रत लिहून ठेवली होती, तशीच्या तशीच ती छापविली आहे; व नावाजलेले लेखक राव. विनायक कोंडदेव ओक ह्यांनी त्यास प्रस्तावना जोडून तींत ह्या कवयित्रीचा बराच जीवनवृत्तांत दिला आहे. ह्या कवयित्रीचा जन्म शके १७९५ मध्ये झाला. त्या लहानपणांत बहुतेक आपल्या आजोबांजवळ, झणजे रामचंद्र चिंतामण सहस्रबुद्धे, ह्यांच्याचपाशी असत. त्या घरांतल्या घरांतच लिहायाला व वाचावयाला शिकून पोथ्यापुस्तकें वाचूं लागल्या. शिवाय, त्यांचे वडील हणजे राव० बळवंतरावजी गायनशास्त्राचे फार शोकी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे नेहेमीं गवयी लोकांच्या मजलसी होतात. आणखी, रावसाहेब कधी कधी त्या शास्त्रावर व्याख्यानेही देतात. ही सर्व घरचीच तयारी असल्यामुळे, काशीबाईसही संगीताचें ज्ञान लहानपणापासूनच चांगले झाले होते. त्या लहानपणी आपल्या वडिलांबरोबर कधी कधी संगीत नाटकांचे प्रयोग पहावयास जात; व मोठ्या मार्मिकपणाने त्यांतील गुणदोषांचे विवरण करीत. ते ऐकून त्या कुमारिकेच्या बुद्धिमत्तेबद्दल रावसाहेबांसही आश्चर्य वाटे. काशीबाईचे लग्न त्यांच्या आदव्या वर्षीच रा. रा. गणेश रामचंद्र फडके सब इंजिनीअर यांच्या ज्येष्ठ चिरंजीवांबरोबर लागले. हा जोडा फार चांगला होता. काशीबाईस कविता करण्याचा नाद होता हे जाणून रावसाहेब सहस्रबुद्धे व त्यांचे कोणी स्नेही कधी कधी कौतुकाने पाहिजे त्या विषयावर त्यांस कविता करावयास सांगत, व त्याही तत्काळ करून देत. 'छत्री' 'सतार' अशा सांगितलेल्या विषयावर त्यांनी केलेली पद्ये चांगलीं-नव्हे फारच मनोहर-साधली आहेत. प्रस्तुतचे 'सीताशुद्धि' हे नाटक त्यांनी आपल्या चवदाव्या वर्षी रचलें! आणि तें सर्व एका महिन्यांत पुरें केलें. नंतर त्यांस ऋतु प्राप्त झाला. ह्यावरून प्रस्तुत पुस्तकांतील विचार व पये किती कोमल अंतःकरणांतून निघाली आहेत ह्याची वाचकांसही सहज कल्पना होण्यासारखी आहे. मी ह्यापुढील कवयित्रीची हृदयद्रावक स्थितीही ऐकण्यासारखी असल्यावरून ११