या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. थोडक्यांत येथे सांगतो. हे नाटक तयार झाल्यानंतर लौकरच त्यांस अपस्मारासारखी काही व्यथा जडली. डाक्टर व वैद्य यांचे पुष्कळ उपाय केले परंतु गुण नाही. पुढे इ. स. १८८९ मध्ये त्यांना एक विलक्षण स्वप्न पडलें; व त्यांत त्यांस एका महापुरुषाचे दर्शन झाले. ह्या पुरुषाने ही मुलगी एक महिन्याने बरोबर मृत्यु पावेल असे सांगितले. व तो योग टळण्याला नव्याण्णव हिश्शांनी काही मार्ग नाही. मग एक हिश्शाने सांगवेना, असेंही ह्मणाला. ह्या स्वप्नाचा त्यांच्या कोमल मनावर कांही विलक्षण ठसा उमटला. व आतां एक महिन्याने आपण इहलोक सोडून खास जाणार अशी त्यांच्या मनाची खात्री झाली. तेव्हां वास्तविक झटले तर त्यांच्या मनाची चलबिचल व्हावी. त्या गांगरून जाव्यात. पण तसे झाले नाही. त्यांच्या मनाची समता कायम होती. आपण आतां परलोकी जाणार व आपल्या मातापितरांस अत्यंत दु:ख होणार हे मनांत येऊन त्यांनी त्यांच्या सांत्वनपर अशा काही कविता केल्या. आणि त्या त्यांनी एका पाकिटांत बंद करून आपल्या धाकट्या बहिणीपाशी दिल्या. आणि तें पाकिट आपल्या पश्चात् फोडण्यास सांगितले. ह्या कविता फारच सरस आहेत. इतकेच नव्हे, तर प्रस्तुत नाटकांतील पद्यांहूनही त्या विशेष चित्ताकर्षक आहेत. ह्यास्तव त्यांतील एक दोन पद्ये देतो. पित्यास अनुलक्षून त्या हाणतात: ताता वंद्य तुह्मी ह्मणोनि चरणी ठेवूनि भाळाप्रती | mal प्रार्थी बालक हे तुह्मांसि वडिलां अज्ञान ज्याची मती । उत्पत्ती जगती स्थिती लय करी इच्छे प्रभू जो असे । प्रेमें वंदुनि तो उमापति हृदी काव्यासि वानीतसे ॥१॥ पद. ताता शोकाकुल नच व्हावें । मम विनतीते लक्ष्य असावें ॥ध्रु० ॥ शाखा सद्गुण बहु विनयाची । पालवि कुसुमें ती शांतीची ॥ आदर छाया मुळे दयेची । लोकप्रियता श्रीच ह्मणावें ॥ ता० ॥१॥ ऐशा तरुच्या या तुलनेसी । योग्य तुह्मी प्रिय जनक आह्मासी । उदरीं फल तव मीच तयासी । भाग्य किती मम हेचि पहावें॥२॥ मातेस अनुलक्षूनः