या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रील १९०१. अंजनीगीत. लाल शोकानल तो मम मातेचे । दग्ध करिल वन तनुलतिकेचें । कोमल अंतर स्त्रीजातीचें । अज्ञानी भरते ॥ १॥ तव मुख धन तो होउनि त्यासी । बोधरूपि त्या जलधारेसी । वर्षनि सत्वर या समयासी । शीतल तो व्हावा ॥२॥ अमरचि गे कोण झाला सांगे या भूवरी। गति ऐसी मृत्यलोकी होते ती यापरी ॥ नामा शोकाच्या व्यर्थ कां त्या तिमिरातें पसरिसी। sical ज्ञानाच्या तपनाते हृदयीं कां लपविसी ॥ १ ॥ ह्यांतील कवित्वस्फूर्ति किती बरे नैसर्गिक आहे ? हे कोमल अंत:करणांतील प, रिपक्क विचार पाहून कोण बरें आश्चर्यचकित होणार नाही ? असो. हा महापुरुषाने सांगितलेला काशीबाईंचा अपमृत्यु महत्प्रयासाने टळला. व त्याच दिवशी त्या महापुरुषाने त्यांस पुनरपि स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिले. तेव्हां त्या तेजस्वी सत्पुरुषाविषयी त्यांच्या मनांत अत्यंत पूज्य भाव उत्पन्न होऊन त्या त्यास आपले जीवस्य कंठस्य दैवत मानूं लागल्या. त्या महापुरुषास त्या 'अण्णा" हणत. ह्या महापुरुषानें काशीबाईच्या स्वप्नद्वारे वगैरे त्यांच्या घरांतील मनुप्यांस अनेक अलौकिक चमत्कार दाखविले आहेत; व त्या स यांचे रावसाहेब सहस्रबुद्धे ह्यांच्यापाशी तारीखवार केलेले टिपणही पण आहे. वर सांगितलेला काशीबाईचा अपमृत्यु टळला खरा, परंतु त्या दिवसापासून त्या झिजणीस लागल्या. तेथपासून त्यांनी हांतरूणच धरलें; व तशा विपन्नावस्थेतच त्यांस पांच मुले झाली. त्यांपैकी एक हल्ली सहा सात वर्षांचा मुलगा मात्र काय तो उरला आहे. प्रत्येक गरोदरपणी व बाळंतपणी त्यांचे फार हाल झाले. इतके जरी त्यांस कष्ट होत, तरी त्या नेहेमी शांतवृत्तींत आणि ईश्वरभक्तींत आपला काळ घालवित. अशा प्रकारे इहलोकींची यात्रा करून आपल्या बाळंतपणाच्या पांचव्या खेपेस, आठव्या दिवशी-झणजे आषाढ शुद्ध १३ शके १८१८-सौ० काशीबाईनी शांतपणे इहलोक सोडला! आणि आपल्या मातापितरांस आणि इष्टआप्तांस दुःखसागरांत लोटून दिले ! त्यांच्या हातच्या काही