या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. थोड्या कविता, व हे प्रस्तुतचे 'सीताशुद्धि' नाटक येवढेच काय ते त्यांच्या संबंधाचे स्मारक उरले आहे. तेव्हां आता त्याच्याच संबंधाने दोन शब्द लिहूं. 'सीताशुद्धि' ह्या नाटकाची रचना सौ० काशीबाईनी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून केलेली आहे. त्यांच्या वडिलांचे त्यांस असे सांगणे होते की, संगीत नाट्यरचनेस असें आख्यान ध्यावे की, त्याजवर आजपर्यंत कोणतेही नाटक झालेले नाही. तेव्हां त्यांनी 'सीताशुद्धि' चरित्राची योजना केली ह्यांतही त्यांचे चातुर्यच दिसून येते. कारण, रामायणाची योग्यता भारतापेक्षाही विशेष मानतात. सीताशुद्धीमध्ये पंचवटींतून रावणाने सीताहरण केल्यापासून तो रामचद्रांनी सीता परत आणीपर्यंत सर्व भाग संक्षिप्त रीतीने आणलेला आहे. त्यामुळे प्रत्येक भागाचा तपशीलवार वृत्तांत पहावयास मिळत नाही हे खरे, पण त्यांत ठिकठिकाणी निरनिराळ्या रसांचा अनुभव घ्यावयास मिळतो, हा एक मोठा फायदा आहे, कवितेमध्ये कोमल शब्दरचना, अर्थगौरव, भारदस्तपणा व नीतिपर वचने हे गुण प्रमुख असल्यामुळे ती मनास आल्हाद दिल्यावांचून राहत नाही. कित्येक ठिकाणी उपमालंकार, व वनश्रीचें वर्णनही कवयित्रीने मोठे बहारदार केले आहे. भक्ति, पतिपत्नीप्रेम दाखविण्यांत त्यांचे कौशल्य विशेष दृष्टीस पडते. ह्यास्तव प्रस्तुत नाटकांतील पद्यांचा मासलाही वाचकांच्या कानावर पडावा ह्मणून एक दोन पद्ये देतों: मारीच राक्षसाची मायावी हाक ऐकून सीता लक्ष्मणास जावयास सांगू लागली, तेव्हां लक्ष्मण ह्मणतात: पद (थाटमाट सदनिं नवा) ह्या चालीवर. 1 वनिं असे रामराय एकटा जरी ॥ शक्त त्यासि जिंकण्यास नाहि भूवरी ॥ध्रु० ॥ शूर धीर रामराय एक तो असे । तत्सम जागें अन्य बली कोणि गे नसे ॥ क्षत्रांतक भार्गवही लोपला असे ॥ सारे हे कपट खचित जाण सुंदरी ॥ १ ॥ नंतर रावणानें कपटवेषाने सीतेचे हरण केले, तेव्हां ती पश्चात्ताप करते: पद-( मना तळमळसी) ह्या चालीवर. हतभागी ठरली, खचित ही हतभागी ठरली ॥ कपटरूपि या काळे हरिली, चरण अंतरली ॥ध्रु० ॥ मृगतनुकंचुकीसाठिं कोमल, मूर्ति तुझी श्रमविली ॥ १॥