या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रील १९०१. भक्तशिरोमणी सौमित्राते, दुष्ट वचन ही वदली ॥ २ ॥ तव विरहाच्या सागरिं आतां, दुर्दैवे ही बुडाली ॥३॥ नक काळमुखांतूनि काढिल ऐशी, त्वत्पदि आशा धरली ॥ ४॥ आतां रामचंद्राच्या शोकाचा एकच उतारा. ते हंसास अनुलक्षून ह्मणतात:IPS पद-(लक्ष्मीसम चंचल) ह्या चालीवर. EMINER हंसा हे जोडुनि कर प्रार्थितो तुला ॥ अटविं तूं सत्वर मम प्राणसखीला ॥ ध्रु० ॥ गौरवर्ण कांति किती । झळकतंसे दंतपंक्ति ॥ कमलापरि नेत्र दिसती । सहज मृगा लाजवीती ॥ मोहक ती रम्य मूर्ति । वेधुनि मम चित्त नेति । कवणे ती रमणी हरिली सांग तूं मला ॥१॥ शितावरून भाताची परीक्षा' या न्यायाने वर घेतलेल्या थोड्याशा उताऱ्यांरून कवयित्रीच्या गुणांची गुणज्ञ जनांस सहज कल्पना होण्यासारखी आहे. माता पुस्तकपरीक्षेच्या रीतीप्रमाणे हाटले ह्मणजे दोषस्थळांकडे वळावयाचे, परंतु साधाभोळी अबला, केवळ गृहशिक्षणानेच उन्नतीस पोंचलेली, वयाने सुकुमार, जिचा अल्प जन्मही कष्टतर स्थितीत गेलेला, मूळ पुस्तक छापण्याची कल्पनाही जिच्या मनांत नसल्यामुळे मूळ खावर पुन्हां जिचा हातही फिरला नाही, तिच्या कौतुकयुक्त कृतीकडे दोषैकदृष्टीने पहाण्याचा मनास धीरच होत नाही. आधा त्यांत अक्षम्य असे फारसे दोषच नाहीत. अल्पस्वल्प छंदोभंग व थोडीं बहुत अशुद्ध कोठे कोठे दृष्टोत्पत्तीस येतात, पण त्यामुळे ह्या साध्याभोळ्या कृ। तास न्यूनता तर येत नाहीच. पण उलट ती भूषणभूतच होऊन राहतात. कारण, अलीकडच्या होतकरू व शिरजोरकरू कविवर्यात बळेंच मुसंडी देऊन घुसू पाहणाऱ्या कवींत सांपडणाऱ्या असंख्य दोषांसारखा हास्यास्पद दोष तर ह्या अबलेच्या कृतींत मुळींच दृष्टीस पडत नाही. येवढेच नव्हे तर उलट, पूर्वी सांगितल्याप्रमाणे भाषा सरळ, प्रौढ व ठिकठिकाणी रसिकजनांस लोलुप करणारीच दृष्टीस पडते. ह्यापेक्षां सौ० काशीबाईच्या कीर्तीस अधिक भूषणास्पद ते काय आहे ? त्यांच्या निर्मल व थोर आत्म्यास परमेश्वराने तसेंच स्थान दिले असेल ह्यांत तिळमात्र शंका नाही. PRIE रावसाहेब सहस्रबुद्धे-एज्युकेशनल इन्स्पेक्टर, दक्षिण भाग-ह्यांस पांच