या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९८. २७३ 1. लोकोत्तर चमत्कार, जीत लिन प्रेतांचे मक्तेदार. प्रत्येक मनुष्याचा प्रयत्न आणि इच्छा सुखासाठी; आणि तें सुख पैशाने मिळते अशी समजूत. ह्मणून तो मिळविण्याविषयीं मनुष्य नाना त-हेचे यत्न करतो. सरळ रीतीने यश न आले तर, तो वांकड्यांत शिरतो. त्यांत आपण काय करतो आणि काय नाही, ह्याचीही त्यास शुद्ध राहत नाही. दुसऱ्याचे गळे कापणे, प्राण घेणे अशी घातक कर्मे करण्यासही तो मागे सरत नाही. अशा प्रकारचे दुष्ट व अधम लोक ह्मणजे मनुष्यरूपाने उत्पन्न झालेले राक्षसच होत. असे नराधमही पृथ्वीवर कधी कधी उत्पन्न होतात, आणि त्यांची कृत्ये ऐकून अंगावर काटा उभा राहतो. बर्क आणि हेअर हे दोन पुरुष-पुरुष कशाचे ? राक्षसच-अशा प्रकारचे पाश्चात्य देशांत होऊन गेले. त्यांनी आपल्यासच नव्हे, तर यचयावत् मानवी स्वभावासही कलंक लावून इतिहासामध्ये आपलीं नांवें काळ्याकुट्ट रंगानें नोंदवून ठेवली आहेत. ती त्यांची कृष्णकारस्थाने सांगण्याचा आज संकल्प केला आहे. पाश्चात्य देशामध्ये मनुष्याची प्राणहानि होण्याला हल्लीच्या काळांत एक मोठे चमत्कारिक साधन निघाले आहे. ते कोणतें ? तर आयुष्याचा विमा उतरणे. ज्याच्या नांवचा विमा उतरलेला असतो, तो मयत झाला ह्मणजे त्याच्या पश्चात् त्याच्या वारसाला, किंवा तो ज्याचें नांव दाखल करून ठेवील त्याला ठरलेली रक्कम मिळते. हेच तोंडाला पाणी सुटण्याचे कारण. ह्यामुळे अनेक अनोपात होत असल्याचे वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत आहे. कित्येक, नीच, दरिद्री, लोभिष्ठ आईवा आपल्या लहान लहान मुलांचा विमा उतरतात, आणि मग त्यांचे-प्रत्यक्ष पोटच्या गोळ्याचे-हाल हाल करून, त्यांस उपासमार घालून ठार मारतात ! आणि लागलीच मोठ्या आनंदाने जाऊन त्यांच्या विम्याचे पैसे घेऊन खुशाल आपलीं पोटें जाळतात !! तेव्हां आईबापांच्या ममतेची, मानवी स्वभावाची, आणि धनलोभाची कमाल आहे की नाही? मग कन्याविक्रयालाच कां हांसावें? हेच बीज सांप्रत आमच्या देशा ३५