या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. आर्यागीति. तुभ्यं ददामि कन्यामस्यास्सततं सुपालनं कुर्याः । त्वद्वेशवर्धनीया रमेशकृपया रमेव सा भवतु ॥ ६ ॥ श्लोक. RETREE माता:-मुलीस नच म्यां कधी जवळुनी दुरी ठेविलें घरी न दिसली, तरी नच मला बरे वाटले बघेन मुख-चंद्रमा झडकरी कधी ताइचा वियोग मजला गमे कठिण फार तो आजचा १ मला शयन गोड हे, तिजविना नसे लागले तिला जवळ घेतल्याविण नसे कधी जेवले मिळे मजसि गोड, तें तिजसि द्यावया ठेविलें । कठीण भव-पाश हा, ह्मणुनि आंसवें पातले २ न गोड घर लागते, करमतें न कोठे मला जा पहा असति खेळणी, शिवण-काम, तो बंगला करी कितिक चांगले सतत कोणतें काम ती हुशार सगळ्यांत म्यां तिजसि फार केले किती ३ तुह्मांस विहिणी अह्मी विनवितों करा जोडुनी - अजाण मुलगी असे, तिजसि ध्याच सांभाळुनी तुह्मी तिजसि कन्यका समजुनीच वागा घरी कुटुंब बहु चांगले, ह्मणुनि लोक गाती तरी ४ आई बाप तुझे मुली समज गे, ही सासु हे सासरे भाऊ दीर, बहीण जाउ, धरिसि तेणें तुझें हो बरें 'आज्ञा पालन' हे तुझें सततचे कर्तव्य गे सासरी ऐशी वागसि तूं, तरी मग मला आनंद हो अंतरी ५ आर्या-गीति. श्री कन्ये श्वश्रुः श्वशुरः पश्यामू चेतराञ्जनान्सर्वान् । अयि ! ! ! कंठः सद्गदितो, न मुखाच्छब्दो, मनः स्थिरं नास्ति॥६॥ विनंतिः-श्रेष्ठ-खग कोकिळाला अल्पकृति करूनि भेट ही दिधली वाटे बरी, तरी ही ठेवावी समजुनीच प्रीतितली १ गजानन गोपाळ जोशी, मराठी शिक्षक चांदवड-नासिक.