या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रील १९०१. 11 श्रीशं वंदे. नासिक, चैत्र शुद्ध १ शके १८२३. रा. रा. के. को. कर्ते यांस. in ज्ञानेश्वरी अध्याय ३रा, श्लोक ३७ वा यावर फटका. शो काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ॥ । महाशनो महापाप्मा विद्धयेनमिह वैरिणम् ॥१॥ फटका. श्रीज्ञानेश्वर सत्पुरुषाची वाणी सुंदर सुरगंगा ॥ केल्यावरि यत्पान तयाचें जाय निश्चयें अघ भंगा ॥ध्रु० ॥ श्रीपुरुषोत्तम योगिजनांच्या हृत्कमलाचा आराम ॥ भक्तांविषयीं सदा जयाचें सदय हृदय तें निष्काम ।। अर्जुनास तो ह्मणे सांगतों ऐकें चित्ता देउनिया ॥ पाहें कामक्रोधरिपू हे ज्यांनी पिळिली ही दुनिया ॥ दोघे असती काळासम ह्यां नसे दयेची सांठवण ॥ किंवा असती यमासारखे धरी अंतरी आठवण ॥' ज्ञानाच्या त्या ठेवीवरचे भुजंग दोघे हे वैरी ॥ फार भयंकर पीडा करिती व्रीडानाशक हे जहरी ॥ विषयदयांतिल वाघ सत्य हे वाचविती कैसे सांग ? ॥ की भजनाच्या मार्गावरचे मारक निर्दय हे मांग ॥ देहरूप किल्लयाचे धोंडे मोठे मोठे हे असती॥ तसे इंद्रियग्रामाचे हे गांवकुसासम मज दिसती ॥ सदा जगावर चालू ह्यांचे अज्ञानादिक बंड असे ॥ 'आश्रय देउनि ह्या वैयांना होती लोकी थंड कसे ?' ॥ रजोगुणात्मक मानस ह्यांच्या दोया वेती फांसोनी ॥ ह्या दोऱ्यांनी बंधन होता सुटे न ह्यांच्या पासोनी ॥ असे आसुरी संपत्ती ही पूर्णत्वे ह्यांची आई ॥ ह्यांचे पोषण करी अविद्या-रूपे होउनिया दाई ॥ रजोगुणात्मज जरि हे असती तरी करी तम सत्कार ॥ त्याने मोह प्रमाद दिधले ह्यांस आपले अधिकार ॥ जीवितास हे वैरी असती पाश तयांचा बहु खोटा ॥ १२