या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. यास्तव त्या मृत्युच्या पट्टणी मित्रभाव ह्यांचा मोठा ॥ हे रिपु जेव्हां होति भुकेले तेव्हां एका घांसाला ॥ सगळे त्यांना विश्व पुरेना तोडिति त्याच्या मांसाला ॥ - व्यवसायाची वृद्धिंगत ती आशा करिती मात्र महा ॥ त्या आशेचा प्रताप लोकीं असे केवढा तरी पहा ! ॥ सहज कौतुकें तिने झांकली मूठ जरी निजहस्ताची ॥ तरी चतुर्दश भुवनांची ती खबर नसे लागायाची । पाश भयंकर ह्या आशेचा मोठ्यांनाही दे दैन्या ॥ झाली तिजला बहु आवडती भ्रांति धाकुटी ती कन्या ॥ लीलेने ही सहज खेळतां त्रैलोक्याची भातुकली ॥ करूनि त्याला गिळूनि सगळे भ्रांति नसे काही चुकली ॥ ह्या भ्रांतीची दासी तृष्णा करी सदोदित तत्सेवा ॥ तत्पर असल्यावरिही तृष्णा भ्रांति करी त्या क्षीण जिवा ॥ असो तयांचा मोह राखितो सर्वकाळ बहु सन्मान ॥ मोहाची ही सेवा बघतां डोलविती रिपु निज मान ॥ अहंकार जो सर्व जगातें बह हौसेने नाचवितो ॥ तो ह्यांच्याशी देवघेविचा सर्वकाळ धंदा करितो ।। सत्याचा तो रम्य कोथळा पाडुनि ह्यांनी तो चिरिला ॥ असत्यरूपी गवताचा तो पेंढा त्याच्या मधिं भरिला ॥ दंभ वाढवून जगीं सोडिला कोण पुसे त्या सत्संगा ॥ यापरि कामक्रोधाच्या ह्या भुलले जन ऐशा ढंगा॥ श्रीज्ञानेश्वर सत्पुरुषाची ॥१॥ शांतिरूप त्या पतिव्रतेला नागवूनिया सोडियलें ॥ माया मांगिण शृंगारुनिया तिला समाजी ढकलियलें ॥ मग ती मांगी शिरली आंगी झाला नंगा नाच तिचा ॥ साधूसमुदायास विटाळी फार भयंकर काच तिचा ॥ रम्य अशा ह्या विवेकाश्रमा ह्या शत्रूनी मोडियलें ॥ वैराग्याचे तसें चामडे सोलुनि ह्यांनी काढियलें ॥ उपशम याची मान मोडिली जिताच त्याला गाढूनी ॥ संतोषाचा बाग तोडिला झाडुन सगळा मोडूनी ॥