या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रील १९०१. धैर्यरूप तो किल्ला सगळा ह्यांनी खणून काढियला ॥ उपडुनि आनंदाचा रोपा अवघा फडशा पाडियला ॥ बोधरूप रोपाची खच्ची केली, सुख तें दुराविलें ॥ मुळांत तापत्रयाग्निने हे सगळे वैभव जाळविलें ॥ असती कामक्रोधरिपू हे देहासमेत घडलेले ॥ तसेच दिसती सर्व जनांतें जीवा समेत खिळलेले ॥ असे असुनियां शोधायाला रात्रंदिन मानव गढती ॥ परि ते ब्रह्मादिकांस सुद्धां शोधियल्या नचि सांपडती ॥ चैतन्याचे हे शेजारी आळीमधले ज्ञानाच्या ॥ झणून करिती मारामारी नायकूनि गोष्टी साच्या ॥ पाण्यावाचुन जना बुडविती ऐसे कामक्रोधरिपु॥ आगीशिवाय सत्य जाळिती मनुजांची हे नित्य वपु ॥ शस्त्रावांचुन ठार मारिती करिति जिवांचे कंदन तें ॥ दोरावांचुन धरिती करिती सर्व जनांसी बंधन तें ॥ पैज मारुनी अणीबाणिनें सज्ञान्याला वांकविती ॥ गार करुनिया देह तयाचा ठार तयातें हे करिती ॥ चिखल नसुनि हेचि खल दोनी ही ओघे लोकां त्रासविती ॥ रुतवितात जणु चिखलामध्ये अघटित घटना भासविती ॥ पाश नसुनिया ह्यांच्यापाशी जे ह्या पाशी जन पडले ॥ दाव्यावांचुनि व्यर्थ तयाला सत्यपणे बंधन पडलें ॥ मळकट असतां बळकट दिसती स्वबळे कोणा नायकती ॥ एवं कामक्रोधरिपूंचे वर्णन त्यांची अशी कृती॥ श्रीज्ञानेश्वर महासाधुची वाक्सुमनें जी परोपरी ॥ त्यांतिल कामक्रोधाचे हे रूपक उत्तम किती तरी ॥ मायेचा तो पहिला फटका श्रावण मासामधिं रचिला ॥ केरळकोकिळभांडागारी नवव्या अंकी तो खचिला ॥ सुमनद्योतक पोतक ह्यांच्या दुसऱ्या फटक्याचा घुटका ॥ घेतां तन्मय वृत्ति जाहली मम हृदया लागे चटका ॥ ह्या चैत्राच्या पहिल्या दिवशीं फटका रचिला बलवंतें ॥ १ बळवंत खंडोजी पारख-नासिक.