या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. यद्दोषांची क्षमा करावी सार घेउनी गुणवंत ॥ कामादिक जरि दंगा करिती तरी भजावें श्रीरंगा ॥ तत्पदकंजी घालित रुंजी ठेवा अक्षय मनभंगा ॥ श्रीज्ञानेश्वर सत्पुरुषाची वाणी सुंदर सुरगंगा ॥ केल्यावरि यत्पान तयाचें जाय निश्चयें अघ भंगा ॥२॥ समान बळवंत खंडोजी पारख. "देवा ! विपत्काल दे!" श्लोक. द्यूतांत सर्व हरतां निजवैभवास ते पांडुनंदन वनीं करिती निवास । सद्भक्तिनें करित सन्मुनि-साधुसेवा प्राणप्रिया स्मरुनि संतत वासुदेवा १ तो एकदां सहज तद्वसतिस्थलास ये भक्तवृंद सुरवृक्ष जगन्निवास ! आनंद पाहुनि तया बहु पांडवांला झाला जसा जननितें चुकल्या मुलाला! २ सामोरे जाउनी ते यदुकुलतिलका आणिती स्वस्थलातें साष्टांगें तत्पदातें नमुनि बसविती आसनी माधवातें । दावोनी आदरातें सविधि सविनये सारुनी पूजनातें जोडोनीयां करांतें करिति मग अशा प्रेमभावें स्तवातें ३ पातलासि सदया ! यदुराया ! । दर्शनें स्वभजका सुखवाया । दाटले परम सौख्यद पर्व । जाहलों मुदितमानस सर्व ४ पांडवांवरि विभो! उपकार । जाहले तव अनंत अपार । होउनि स्मृति सदैव मनाला । येतसे भरुनि कंठ दयाला! ५ आमुची जननि तूं , प्रिय बाप । तूंच सर्व हरिता भवताप । कोण रक्षण करी ? यदुनाथ ? । पांडवां तुजविण व्यसनांत! ६ बाहतां पडलिया जड भारी । धावुनी प्रगट होशि मुरारी !। राखिसी हरुनि संकट लाज । सत्कृपानिलय तूं यदुराज! ७ ताप यापरि घडे तुज फार । तूं परी गणिसि हा न विचार! काळजीस अमुच्या यदुराया ! । लागते तुज सदैव कराया ! ८,