या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रील १९०१. पूर्व पुण्य ह्मणुनीच अझांस । श्रीहरे ! खचित सांपडलास । कोण वणिल तुझी जन लीला ? । यत्स्मृती करि विनाश कलीला ! ९ राहतों जरि महाविपिनांत । त्वत्कृपें परि उणें न सुखांत । आज भेट दिधली सुखदायी। केंवि होउं सदया! उतराई ? १० यापरी परिसुनी स्तवनास । हर्ष होय जगदीशमनास । दासभक्तिवश माधव डोले । तो पृथेस मग यापरि बोले ११ बघुनि विमल युष्मद्भक्ति माझ्या मनास अपरिमित जहाला गे पृथे ! हर्ष खास । licen सुख-वर तुज द्यावा हेतु हा चित्तिं वागे ह्मणुनि वर बरा तूं कुंति मागोनियां घे ! १२ कुंती जोडुनि तें करांस वदली विश्वंभरा आदरें ध्या मागुनियां वरास न मला इच्छा अशी श्रीहरे! येशी धांवुनि संकटांत बघुनी आह्मां दयालो ! त्वरें पाता तूं हरि, काय बा मग कमी आझांस आहे बरें ? १३ आज्ञाधारक पुत्र पांच झटती आनंदवाया मला पांचाली, भगिनी तुझी मज अशा देवा ! स्नुषा निर्मला । आहे सुंदर पौत्रवर्ग; जरि या राहें अरण्यांत मी देवा! पूर्ण कृपा तुझी मजवरी मातें न कांहीं कमी ! १४ साधूंचा सहवास या वनि मिळे आनंद होतो मना काहीही उरली खरोखर नसे माझी विभो कामना! । आज्ञा मान्य झणोनि मागुनि असें घेतें दयांभोनिधे! तूं देणार यदूत्तमा ! तरि सदां "देवा ! विपत्काल दे!"! १५ कुंतिभाषण असे परिसून । काय बोलत रमेश हंसून । याचिला मज पृथे ! वर काय ? इच्छिसी तरि किमर्थ अपाय ? १६ अन्य घेई वर मागुनि आतां । तूं विचार करुनी सुखदाता। माग भीड न धरीं मनिं तूर्ण । मी तुझ्या करिन हेतुस पूर्ण १७ कुंती वदे सविनये यदुनायकास म्यां याचिला वर विचार करोनि खास । आश्चर्य यांत गमलें तुज सांग काय ? दे या वरास, मज यांत नसे अपाय १८