या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. देवा! नकोत मज ते दिन वैभवाचे नाला जे सोयरे मम मना गमती भवाचे। संपत्ति मोहुनि करी सकलांस दासला तहास शून्यमति तो चढतो मदास १९ । आह्मां स्थिती जरि मिळेल अशी दयाला! जाणे तुझ्या खचित अंतरलों पदाला। संपत्तिमत्त बनल्यावरि पांडवां या तूं दास भक्तिवश का मिळसी पहाया? २० शिव! शिव! शिव! देवा ! तो नको दुष्प्रसंग तव पदरति राहो शुद्ध आह्मां अभंग!। जवळि जरि सख्या ! तूं राहसी वासुदेवा ! जाति तरि सकल सुखाचा तुच्छ आह्मांस ठेवा! २१ धन कनक नको तें तें नको राज्य देवा! 100 सतत मज घडावी आपुली पादसेवा। तव विरह नसो या श्रीहरे ! सेवकांसा तरि सदय रमेना ! पात्र होऊं सुखास ! २२ जनमत कठिण समय येती मानवाच्या सुखातें । ह्यणुनि तरि विभो ! त्वन्नाम येतें मुखातें । स्मरण घडतसे या त्या निमित्त मनाला बघुनि विमल भक्ती पावसी तूं जनाला २३hotos ह्मणुनि विनति माझी हीच देवा! पदास कठिण समय राहो या भवत्सेवकांस । स्मरण तव घडोनी सर्वदाही मनाला खचित मग न देवा! पार अस्मत्सुखाला २४ ला ऐकोनी भाषणा या मृदुतर हरिच्या हर्ष झाला मनास । बोले हांसोनि कुंती! अससि खचित गे! धन्य! तूं धन्य खास । इच्छा साऱ्या तुझ्या या असति सफल मी दूर नाही तुझांस देवोनी या वरातें यदुमुकुटमणी जाय तो स्वस्थलास २५ 'कल्लोळकर.'