या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रील १९०१. चीनदेशांतील ह्मणी. १ जोपर्यंत रस्त्यावर आहों, तोपर्यंत भटकण्याची भीति नाही. २ विधवा स्त्री ही सुकाणूं नसलेल्या नावेप्रमाणे आहे. ३ उंच व भेगलेली भिंत ढांसळावयाचीच. ४ आपणांस तळी भरतां येतील, परंतु मनुष्यांचे मन कोण भरणार ? ५ ज्यावर जहाज तरंगते, तेंच पाणी त्यांत शिरतें. ६ कधी निजले नाही, तरी बिछाना घाण हा होणारच. ७ एका दिवसाच्या कामाकरितां हजार दिवस सैन्य बाळगावे लागते. ८ गोड शब्द हे मोत्यांच्या सरासारखे आहेत. ९ अभाळ जातें, पण पाऊस राहतो. १० शंभर नंबरी सोन्याला आगीचे भय नाही. ११ झाडांची पाने गळून पडली तरी, वसंत ऋतूंत त्यांला नवी पालवी फुटेल. पण मनुष्याला तारुण्य मात्र दोनदां यावयाचें नाही. १२ खरेदीचा हिशेब करण्यापूर्वीच विक्रीच्या हिशेबाला सुरवात. १३ पाण्याला वाळूचा बांध काय होय. १४ शब्दांची जखम करावयाला एक क्षण पुरे होतो, पण ती बरी व्हावयाला फार काल लागतो. १५ व्यवहारांत फसावयाचें नसेल, तर चार दुकानी किंमत विचारावी. १६ ज्याचा चेहरा प्रफुल्लित नसेल, त्याने दुकान उघडावयाची तसदी घेऊ नये. १७ नफा हा ह्या टोंकापासून त्या टोकापर्यंत माशीच्या पंखासारखा जात असतो. १८ एक ठिणगी हजारों डोंगरांना जाळून टाकावयाला बस्स् होते. १९ शेंकडों दुःखें निवारण करावयाला एक आनंद बस्स् आहे. २० सन्मित्र असतात ते. जेव्हांच्या तेव्हां-रोखठोक बाकी पूज्य करून टाकतात. २१ आकाश हे सर्वांत उंच ह्मणतात, पण मनुष्याचे अंतःकरण त्याहून ही उंच आहे. २२ शाबूत असलेल्या खड्यापेक्षां भंगलेला हिरा पुष्कळ बरा. २३ मनुष्याचें जीवित ही वाऱ्यांत पेटलेली ज्योत आहे. २४ सुईशिवाय कोणालाही शिवतां यावयाचें नाही. २५ कोरड्या बोटाला मीठ सुद्धा चिकटत नाही.