या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वे. तही पसरून त्याचे तरु उगवत चालले आहेत. मुंबईस नुकतेच एका विमा उतरून ठेवलेल्या गृहस्थाच्या मित्राला, एका विमा उतरणाऱ्या कंपनीने फांसावर चढविल्याचे आमच्या कितीएक वाचकांना कदाचित् माहितही असेल. परंतु आमी वर सांगितलेल्या दुकलीची कडी ह्याहूनही वरची आहे, करितां त्यांचंच आख्यान आतां सुरू करूं. _इ० स० १८२८ त स्कॉटलंडमध्ये वैद्यशास्त्राची चांगली भरभराट झाली. तेथील शस्त्रवैद्यांनी मनुष्यांची प्रेतें फाडून पाहून नव्या नव्या शोधांनी शारीरशास्त्रामध्ये भर घालण्याचें मनावर घेतले होते. पण अशी शरीराची विटंबना करण्यास रोज रोज प्रेतें देणार तरी कोण? आणि ती मिळणार तरी कशी? तेव्हां ती त्यांनी विकत घेण्याचे ठरविले. उन्हाळ्यामध्ये प्रत्येक प्रेतास ते ८ पौंड देत, व हिवाळ्यांत मृत्युसख्या कमी असल्यामुळे प्रेतांची जरा चणचण असे, ह्मणून त्या दिवसात ते दर प्रेतामागे १० पौंड देत. तरीही प्रेतें पुरेशी मिळण्याची मारामारच पडे. कारण, उघडच आहे की, आपल्या जिवलगाच्या मृतदहाला का होईना ? पण छिन्नभिन्न केलेले मायेच्या माणसाला कसे खपणार ? तेव्हां अर्थातच ह्या कामाला प्रेत मिळावयाचें तें, ज्याचे आप्त दारिद्याने गांजलेले असतील त्याचें, किंवा जो कोणी अनाथ असेल त्याचे मिळावयाचे. त्यावांचन दसरा मार्ग नाही. तेव्हां अर्थातच ल शस्त्रवद्याना आणखीही प्रेतांची किंमत वाढविणे भाग पडले. प्रत्यक प्रताची किमत दहा पौंड होती ती त्यांनी बारा पौंड केली. मणज प्रत्यक प्रेतामागें सव्वाशे रुपयांच्याही वर किंमत मिळू लागली. तेव्हा हा धदा बरा आहे असे मनांत आणून वर्क व हेअर ह्या दोन गृहस्थाना वा ठरविलेल्या दराप्रमाणे प्रेत पुरविण्याचा त्या शस्त्रवैद्यांकडन मक्ताच घेतला आणि त्या कामास लागले. ' ___हे दोन गृहस्थ आयर्लंडांतले राहणारे होते.. तरी त्यांनी एडिबरो शहरांतील ओल्डटाउनमध्ये आपला धंदा सुरू केला. प्रथम प्रथम त्यांना गरीबगुरिबांची बरीच प्रेते मिळत. परंतु पुढे पुढे त्यांचाही तुटवडा पडूं लागला. तेव्हां त्यांनी बिनदिकत दुसऱ्याचे जीव घेण्याचे काम सुरू केले! एखादा अप्रसिद्ध, ज्याची वास्तपुस्त करणारे नाही. एखादा भिकारी, घरांतून बाहेर पडलेली उंडगी बायको,