या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. जाऊन त्यांऐवजी सुधारलेल्या सर्व साधनांनी गजबजलेली शहरें व त्यांतील आधुनिक नखशिखांत सुधारणादेवीने भारलेली पात्रं जिकडे तिकडे नजरेस येतात. पूर्वीचे चार आश्रम व धर्मार्थकाममोक्षादी चार साधनें जाऊन त्यांची जागा एकट्याच गृहस्थाश्रमाने व इहपरलोकी इतिकर्तव्यता होऊन राहिलेलें जें इंद्रियसुख त्यानेच ती पटकावली. ह्याचबरोबर आमच्यांत एक शोधकपणा आलेला आहे. ह्या शोधकपणाच्या कसोटीस आह्मी साधु ह्मणतों असे लोक फारच थोडे उतरतात. कित्येक 'मी' 'मी' ह्मणणाऱ्या बैराग्यांची व तपस्व्यांची ढोंगें बाहेर निघाली आहेत. परंतु त्याप्रमाणेच सर्व ढोंगी असतात असें ह्मणतां येणार नाही. वरील संस्कृत वचनाप्रमाणे ज्यांची चाल. चालणूक आहे असे पुरुष कोणास बरें वंद्य होणार नाहीत? तर आह्मी आतां खाली अशाच एका सर्ववंद्य पुरुषाचे चरित्र देतो. नाशिक जिल्ह्यांत विगतपुरी तालुक्यांत कावनई या गांवचे दक्षिणेस एकांतांत व जंगलांत अर्धा मैल लांबीवर "कपिलधारा" ह्या नांवचे एक चिरेबंदी बांधिवलेले तीर्थ आहे. तेथे जाण्यास जी. आय. पी. रेल्वेचे घाटा ह्या नावचे स्टेशनावर उतरावे लागते. घोटीपासून तीर्थ उत्तरेस ५ मैल आहे. घोटी व शिरघाटमधील सडकेनें वाकी ह्या गांवापर्यंत सडकचा रस्ता आहे. तेथन पुढे दोन मैल तीर्थ राहते. या रस्त्याने बैलगाडीने प्रवास करावा लागतो. कापलधारा तीर्थ येथे 'सिद्धानां कपिलो मुनिः' ह्यांत सांगितलेले महामुनि कपिल ह्यांनी तपश्चर्या केलेली आहे असे सांगतात. त्या वेळचे एक खाष्टं त्यांचे स्नानाचे होते. ते वेळी हे स्थान मणजे निबिडतर घोर अरण्य जे दंडकारण्य त्याचा भाग होते. पण आता काय : अरण्यही गेले व मुनीही गेले. गोष्टी सांगणारे तरी आहेत हे कालचक्राच्या मानाने भाग्यच समजावयाचे. असो. कपिल महामुनींच्या कमडलूंतून पाणी पाझरले, त्या योगाने हैं तीर्थ झाले अशी आख्यायिका आहे. याच जागेवर शके १७२७ चे वैशाख मासींचे सुमारास कावनई यथाल गणश महादेव कुळकर्णी यांचे वाडवडिलांनी हजारों रुपये खर्च करून चिरेबंदी तीर्थ बांधिले आहे. ते वेळी उत्तर हिंदुस्थानचे बंदीकोटचे राजाकडून काही मदत मिळाली होती.