या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. मे १९०१. ९९ या संस्थानचे मूळ पुरुष 'अयोध्यादास' हे अगदी निरिच्छ व सर्वसंगपरित्याग केलेले असे होते. त्यांचे वेळी तीर्थ बांधलेले नव्हते. खाप्टेंच होते. निबिडतर घोर अरण्यांत गुंफेतच हे तपश्चर्या करीत असत. | अयोध्यादास यांचे शिष्य "द्वारकादास" हे होत. हेही गुरुप्रमाणंच त्यागी होते. यांचे वेळी तीर्थ बांधले गेले. परंतु तीर्थासभोंवतालची धर्मशाळा बांधली गेली नव्हती. द्वारकादास हे गुहेत तप|श्चयो करीत. नंतर देह ठेवण्याची वेळ नजीक आलेली पहातांच त्यांनी आपला शिष्य बद्रीदास त्यास आपल्या मागें सांभाळावयास सागून आपण अयोध्येस जाणेकरितां निघून गेले. काळ जवळ आला अस आढळून आल्यावर आपला देह नदीतील कासवांस अपेण करण्याचा त्यांनी निश्चय केला; व त्याप्रमाणेच समाधी लागल्यावर आपला दह दहन न करितां कासवांस खाण्याकरितां नदीत टाकण्यास सवीस सागि तल; व तदनुसार शुभदिनी अयोध्या येथील महंत श्रीस्वामी मथुरादासजी यांचे हस्ते जटाभार प्रथम उतरविल्यावर वरील योगबलान प्राण सोडला. नंतर शरीर शरयूंत अर्पण केले गेले. " बद्रीदास यांचे कारकीर्दीत सभोंवतीं धर्मशाळा झाल्या, एका बाजूस श्रीराममंदिर, गोशाळा, साधुसंतांस जागा वगैरे सोई झाल्या. वेळी बऱ्याच लोकांनी मदत केली, त्यांत जव्हार संस्थानचे राजे यानाहा मदत केली होती. बद्रीदासांचे पश्चात् त्यांचे शिष्य बलखंडीदास हे कारभारी होत, त्यांचे मागून बद्रीदास यांचे शिष्य बलखंडीदास यांचे गुरुबंधु ह्मणज हल्लीचे महंत श्रीरघुनाथदास महाराज हे संस्थानचे कारभारी आहत. श्रीस्वामी बद्रीदास यांचे वेळी नरसु आपा ऊर्फ दादा वल्लद सतुनार सुभेदार यांणी संस्थानाप्रीत्यर्थ २४ एकर ६ गुंठे, आकार रुपय २५ आणे इतकी काळीची (रब्बीची) जमीन धर्मादाय कपिल महामुनि संस्थानास दिली आहे. नरसु आपा यांस पश्चात् वारस कोणी नव्हते; व औरस संतति नसल्यामुळे त्यांनी आपली जमीन धर्मादाय दिलेली आहे. नरसु आपा हे संसारी होते, तरी ते श्रीस्वामी बद्रीदासजी यांचे चेले होते.