या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. या संस्थानास सरकारचा ठराव नंबर २७५ एलीयनेशन सेटलमेंट आफिसर दक्षिणभाग तारिख १४ एप्रिल सन १८७१ प्रमाणे निरंतरची नेमणूक दरसाल नक्त २० रुपये आहे. सनद नंबर ३३ तारीख १८ आगष्ट सन १८७९. हल्लीचे महंत श्रीरघुनाथदास महाराज यांचे वय ७० वर्षीवर व ७५ वर्षांचे आंत आहे. परंतु फोटोवरून ते कोणास खरे वाटणार नाही. पण सतत ब्रह्मचर्य पाळणाऱ्या साधूंचा ज्यांना सहवास अगर माहिती असेल त्यांना ते अशक्य वाटणार नाही. सिद्धांमध्ये श्रेष्ठतम अशा कपिल महामुनींचाच आश्रम असल्याने आजपर्यंत सिद्धांचीच परंपरा चालली आहे; व हे सिद्धांचेच स्थान होऊन राहिले आहे. कपिल महामुनींनी आपली मातोश्री देवहूती हिला सांख्यशास्त्राचा उपदेश येथेच केला अशी आख्यायिका लोक सांगतात. देवहूती ह्याचा अपभ्रंश देउती व नंतर देवी असा झाला. येथें नजीकच देवीचे देऊळ आहे. श्रीकपिल महामुनी येथूनच कमरू ! कमक्षा ( कमरू कमक्षा ह्मणजे बंगाल ) मध्ये गेले ह्मणून तिला कमक्षा किंवा कामाक्षा देवी असेंही ह्मणण्याचा परिपाठ आहे. कामाक्षा ह्मणजे काम आहे अक्षरूपी जिच्या-ती. ह्या महामुनींच्या आणखीही बिंद सरोवर (सिंधप्रांत ) वगैरे ते जेथे जेथे गेले तेथे तेथें मूर्ति व आख्यायिका आहेत. हल्लीचे मंहत हे सिद्ध आहेत. साधु ह्या पदास योग्य असे आहेत. त्यांचे दर्शन व सहवास; त्यांचा तो प्रेमाचा उपदेश; निरपेक्षता; याचे वर्णन करणे कठीण आहे. योगशास्त्रांतील शरीरशुद्धीच्या धोती पोती इत्यादि क्रिया ह्यांस नित्यशः कराव्या लागत असल्यामुळे मोठमोठ्या शहरी राहण्यास जाणे अशा लोकांस बरेंच अशक्य होते. येथे ५०७६ गाई, लोकांनी धर्मादाय दिलेल्या आहेत. त्यांचे दूध काढले तर क्वचितच फार थोडे काढतात. बाकी सर्व वासरेंच पितात. या तीर्थावर चोहीकडून साधु लोकांच्या झुंडीच्या झुंडी येतात. कधी कधी हा साधूंचा मेळा ३००, ४०० पर्यंत जमतो, व त्यांचे ८८ दिवस मुक्कामही होतात. ते वेळी आजूबाजूची शोभा विशेष रमणीय असते. ती ब्रह्मचर्याची ओजस् चढलेली तेजस्वी शरीरें, ते गी