या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १९०१. तापाठ, ती वेदांत विषयाची चर्चा व जपजाप्य, ती तन्हत-हेची केलेली आसने, त्या मुद्रा व ध्यान वगैरे पाहून एखाद्या नास्तिकाचेही मन थक्क झाल्यावांचून राहणार नाही. तीर्थावरील कायमचे साधूंना फिरस्ते येणार संत यांचेकरितां अत्यंत श्रमाने भिक्षा जमऊन ठेवावी लागते. श्रीमहंत हे सर्वांची व्यवस्था लागल्याशिवाय कघींच अन्न ग्रहण करीत नाहीत. तीर्थावर हमेशच्या १० ते २० पर्यंत साधूंच्या मूर्ती असतात. नेहमी जपजाप्य व वेदांत विषयाची चर्चा चालते. सभोंवार धर्मशाळा असून ज्याप्रमाणे घरास चौक साधावा त्याप्रमाणे तीर्थ मध्यभागी बांधलेले आहे. पूर्वेकडून गोमुखीतून अखंड जलप्रवाह तीर्थात पडत असतो. तीथोस सदोदित ४ फूट २ इंच पाणी असते. हेच पाणी नळ बांधून इमारतीखालून बाहेर ओहोळांत आणले आहे. त्याचा उपयोग गुरास पाणी पिण्यास व धुण्यास होतो. नंतर राहिलेले पाणी बागेश्रील जांब व निबें, तुळशीची झाडे वगैरेंकडेस होतो. बागेची जागा दोन एकरांजवळ जवळ आहे. | तीर्थ सर्व ठिकाणी जीर्ण झाल्यामुळे पाणी चोंहींकडून पाझरत असत; व तेणेकरून गोमुखींतील अखंड वाहणारी जलधारा रोडावली आहे. कलींतील नास्तिकपणा वाढल्यामुळेच की काय, आतां आपली असर नाही असे तिला वाटूं लागले असावे. त्याचप्रमाणे धमोत्मे नाहास झाल्यामुळेच की काय सभोंवतालची धर्मशाळा रागाने खाली सत चालली आहे; व नास्तिकांचा सुळसुळाट सहन न होऊन गोमुखींतून यणारी जलधारा तिचे पाझर फुटून बाजूने चिरेबंदी खडप फोडून खैर वाहत आहे. । महंत यांचा रोजचा क्रम नौलीकर्म करणे, नळ फिरविणे हा आहे. सरासरी ७८ शेर पाणी राहील येवढा लोटा ते बहिदिशेला जातांना नेतात. मनाच्या इच्छेप्रमाणे शक्तिनाडीचे पदर दररोज बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुऊन पुन्हा गिळतात. नौली साफ होण्याकरितां व दरोबस्त मल बाहेर जाण्याकरितां दहा वाजण्याच्या सुमास मिरे, बदाम, वगैरे वाटून भांगेप्रमाणे पाण्यांतून पितात; व नंतर पुन्हा नळ फिरवून दिशेस जातात. हे झोंप घेतांना बहुधा