या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. कोणासच आढळत नाहीत. कारण, उघडच आहे की, रात्रीचा काल तो योग्याचा दिवस. भजनाला निवांत वेळा उत्तम अशी तीच. ह्यांनी चारी धामच्या ह्मणजे (१) बद्रिनारायण, (२) जगन्नाथ, (३) द्वारका, व (४) रामेश्वर ह्या यात्रा केलेल्या आहेत. तसेंच पंचाग्नि धुनीसाधन व चौऱ्यायशी धुनीसाधन, हीं साधनें बऱ्याच वर्षांपूर्वी ह्यांनी केलेली आहेत. त्या वेळी ३ वर्षेपर्यंत ह्यांनी मीठ वर्ज केले होते. ह्याशिवाय हे महंत अयोध्या, बनारस, लखनौ, मथुरा, वृंदावन व दक्षिणेतही बरेच फिरलेले आहेत. मठामध्ये जेवढे साधु येतील तेवढ्यांची व्यवस्था लावणे हे यांचे पहिले कर्तव्य असते. त्यासाठी ते प्रत्यहीं सकाळींच एक दोन शिष्यमंडळी बरोबर घेऊन घोड्यावर बसून आसोपासच्या गांवांतून भिक्षेला निघतात. व दुपारी २।३ वाजतां परत येतात. मठामध्ये ह्मणण्यासारखें कांहींच उत्पन्न नसतां १००। १००।२००।२०० साधूंना अन्न पुरविणे काही सामान्य काम नव्हे. तें केवळ त्यांच्या अपूर्व पुण्याईनेच चालतें असें झटले पाहिजे. मह। तांची मूर्ति पाहतांच त्यांच्या चरणावर लोटांगण घालावेसे वाटते. इतकी त्यांची वृत्ति सच्छील आहे. ते फार शांत, उल्हासी, प्रेमळ व अत्यंत मधुरभाषणी आहेत. सदरहू पवित्र तीर्थ, गतवर्षीच्या आमच्या प्रवासांत आमीं प्रत्यक्ष पाहिले आहे; व सत्पुरुष महंत यांच्या दर्शनाचा व प्रसादाचाही लाभ आमांस घडला आहे. त्या प्रवासाची हकीगत आह्मी स्वतःच लिहिणार होतो. इतक्यांत आमचे खाली सही करणारे परम मित्र-किंवा भक्त ह्मणा-ह्यांनी हा सर्व लेख व तीर्थाचे नकाशेही पाठविले. ह्यास्तव त्यांचा आभारपूर्वक स्वीकार करून सदरहू लेख बहुतेक जशाचा तसाच घेतला आहे; व त्यापुढे त्यांनी जी अत्यंत कळवळ्याची विनंती केली आहे, तीही येथे आह्मांस दाखल करणे इष्ट दिसते. ती विनंती अशी आहे: धर्मशाळा खाली बसून जमीनदोस्त होण्याच्या बेतांत आली आहे. येथे १६० इंच दरसाल पर्जन्य पडतो; व उन्हाळ्यामध्ये ९० अंशांवर पारा असतो. ह्यास्तव वरील इमारत पडल्यास काय बरें दशा होईल ? ६०७९ गायींचे कोण हाल होतील ह्याची कल्पना तरी करती