या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. मे १९०१. येईल काय? साधु लोक कोठे रहातील ? भिक्षा कशी तरी मिळते. परंतु गोब्राह्मण, साधुसंत यांना छाया व पाण्याची झालेली गैरसोय दूर होण्यासाठी कोणी तरी धर्मात्मे तिचा जीर्णोद्धार करून सर्वांवर छायारूपी छत्र धरतील अशी आशा आहे. गोमातांचा पाणी पिण्याचा ओहोळ फुटल्यामुळे व त्यांची तोंडें पाण्यास न पोंचल्यामुळे कितीतरी हाल होतात. आणि इमारत तर सर्व बाजूंनीं पडण्याच्या विचारांत आहे. - ह्याकरितां आमच्यांतील राजे, महाराजे जशी राजनिष्ठा दाखवितात, त्याहूनही ईश्वरभक्तांच्या प्रत्यक्ष ईश्वरांश विभूती ज्या ठिकाणी एकत्र जमतात, त्या ठिकाणावर प्रेम ठेवणे अधिक इष्ट नव्हे काय? जे आझास धमाचे वळण लावतात; दुःखितांचा ताप दूर करून उपदेशामृत पाजून आनंदित करतात; मोक्षाचा मार्ग खुला करून देतात; पातकांचे पर्वत जाळून टाकतात: ब्रह्मसागरांत पोहून पैलतीरास नेतात. याची व्यवस्था न ठेवणे झणजे कृतघ्नपणाच्या शिखरावर पोचणे नव्हे | काय: आध्यात्मिक शास्त्रदृष्ट्या असल्या संस्था व असले सत्पुरुष किती तरी महत्वाचे होत. आजच आमची धर्म करण्याची इच्छा अज्जी नाहीशी झालेली नाही. आमच्यांतील धर्मात्मे, राजे, रजवाडे, प्रसिद्ध माव्य, रीटसावकार ह्यांच्या दृष्टीने अशा संस्था अत्यंत उपयुक्त अस 3ळ त्याच्या मुळाशी पाणी घालून ताज्यातवान्या राखून पुढील पहास (धर्महीन बनवायाचे नसल्यास ) गोड फळ देण्याचे आद्य कतव्य करण्यास ते विसरणार नाहीत. यांत स्वार्थ व परमार्थ दोन्हींही साधतात. शेवटी सर्व धर्मशीलवर्गास आमची सविनय प्रार्थना आहे की, त्यांनी हस्त परहस्ते या तीर्थाचे जीर्णोद्धारास मदत करावी. प्रसिद्ध वर्तमानपत्रकत एकवार तरी हा लेख वाचून त्यास जागा देतील, व श्रेय संपादन करतील अशी फार फार आशा आहे. मदत करणे ती येथे पाष्ट असल्याने महंत श्रीरघुनाथदास गुरु बद्रीदास संस्थान कपिलधारा यांचे नांवें मनीआर्डरीने पाठविल्यास हरकत नाही. तसेच 'केरळकोकिळचे' एडिटर, भाऊसाहेब ऊर्फ जनार्दन महादेव गुर्जर ह्यांजकडेसही मुंबईतील धनिक लोकांनी पैसे दिल्यास हिकडेस पोंचतील,