या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. प्रसिद्ध भाट्ये वगैरे लोकांत धर्मार्थ ह्मणून अंतसमयीं स्वतंत्र रकमा काढलेल्या असतात. अशांतून ट्रस्टी (पंच) मार्फत जागा व ठिकाण समक्ष पाहून कोणी धर्मात्मे एकदम सर्व दुरुस्ती एकच गृहस्थ करतील तर त्यांचे अजरामर नांव राहणार आहे. ह्या नश्वर जगांतून प्रत्येकास सर्व धन सोडून एकदां जावयाचे आहे. ह्याकरितां कोणातरी धर्मात्म्यास अशा सन्मार्गी द्रव्य खर्च करून कायमचे पुण्य संपादन करण्याची सद्बुद्धि तो सर्वांतरात्मा सच्चिदानंद प्रभु देवो, अशी सविनय प्रार्थना करून हा लांबलेला लेख धर्मात्म्यांच्या धर्मादायांची वाट पहातच थांबवितों. आपला कृपाभिलाषी लेखक, गणेश महादेव कुळकरणी, मौजे कावनई, ता. विगतपुरी, जिल्हा नासिक. जीवांशांचे चमत्कार. मनुष्यप्राणी जरी सर्वांत श्रेष्ठ आहे; व त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांत अतिशय सुबक असे त्याचे शरीर आहे; तरी त्याचे शरीर ज्या नमुन्यावर पृष्ठवंशविशिष्ट प्राण्यांची शरीरे केलेली असतात त्याच धर्तीवर केलेले असते. मग ते प्राणी माशापासून ते तहत् चतुष्पद जनावरांपर्यंत कोणतेही घ्यावेत. सर्व प्राण्यांत चतुष्पादवर्ग श्रेष्ठ व त्यांतही पुनः मनुष्य श्रेष्ठ. परंतु जरी आपणास इतर पृष्ठवंशविशिष्ट प्राण्यांप्रमाणेच ह्याचीही रचना आहे असे आढळले तरी त्याचे श्रेष्ठत्व कमी होत नाही. त्याचे शरीर जरी इतरांच्याच नमुन्याचे असले तरी त्याचे जे काही इतर धर्म आहेत की ज्यायोगे त्यास मानवत्व प्राप्त झाले आहे, त्यावरूनच तो इतर प्राण्यांहून कितीपटीने श्रेष्ठ आहे हे सिद्ध होते. त्याची हाडे अशी विलक्षण रीतीने बनविली आहेत की त्यांनी मोकळे ताठ उभे राहून हिंडता येते. त्याच्या मेंदूत व इतर प्राण्यांच्या त्याच अवयवांत सर्वांत मोठी तफावत आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवांत त्याला सर्व सृष्ट जडाजड पदार्थाचा व प्राण्यांचा खामी करण्याचा हेतु स्पष्ट दिसून येतो. आपल्यापेक्षा कित्येक प्राण्यांस