या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. ह्मणजे एक एक लहान काळीजच असते; व काळजाला जे जे काही काम करावयाचे असतें तें तें सर्व ह्याच करीत असतात. काळजाचे जे काम ते सर्व ह्या पेशांची लहान लहान कामें एकवटून झालेले असते. ज्याप्रमाणे इंग्लंदच्या सर्व जगभर वसाहती पसरलेल्या आहेत व त्याच इ. ग्लंडचे राज्य होत, तशाच पेशा ह्या काळजाच्या वसाहती हात: आणि जे जे कार्य काळीज करतें ह्मणून आपणास ठाऊक आहे त त सब त्या करितात. ह्याप्रमाणे शरीराच्या आतील कोणताही अवयव तपासला, तर प्रत्येक अवयव त्याचे सर्व काम करणाऱ्या पेशांचा (तो) बनला माह असं आढळून येईल. आपल्यास ठाऊक आहे की आपला जठरकाश एक पाचक रस उत्पन्न करून त्याने अन्न पचवितो. आतां हा रस तरी कोठून येतो हा प्रश्न येतो. तर हा रस जठरकोशांत असलेल्या हजारा पशातून येतो असे समजून येईल. पुनः सूक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहिले तर ह्या पेशाच रक्तापासून हा रस तयार करितात. ह्या हापर तयार करितात येवढेच नाही तर डोळ्यांतून अश्र, जे ओलावा राखा करितां येतात ते सुद्धां ह्या असल्या पेशाच तयार करितात. आपल्या तोंडांतून जी लाळ येते, ज्या योगानें अन्नाच्या पचनास चांगला मदत होते, ती सुद्धा आपल्या तोंडांतील लाळेच्या पिशव्यांत ज्या पेशा असतात त्यांपासूनच निघते. तसेंच जठरांतून अन्न बाहेर पडल्यानंतर प्याक्रियांतून जो एक रस त्यावर पडतो तोही या पिशवी (प्यांक्रिया)च्या अंगभूत पेशांनींच रक्तापासून तयार केलेला असतो. ह्याप्रमाणे आणखीही उदाहरणे देता येतील. पण येथेच आह्मी हात आखडतों, व एवढेच सांगतों की शरीरांतले प्रत्येक काम ह्या पेशाच करितात. मेंदूत विचार उत्पन्न करितात त्या याच. पित्त, हाडे, अश्रू व लाळ ही तर त्या उत्पन्न करितात हे वर सांगितलेच आहे. ह्या वरील वर्णनावरून आतील क्रियेचा विलक्षण देखावा मनापढ़ें दिसू लागतो व कांहीं मजेदार प्रश्नही सुचतात. कारण प्रथमदर्शनींच आपल्यास कळून चुकत की प्रत्येक पेशी झणजे एक सजीव पदार्थच होय; व ती सर्व प्राणिमा•१ हा एक पोटाजवळ अवयव आहे.