या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९८. २७५ किंवा ज्याचे इष्ट आप्त जवळसार नाहीत असा एखादा पुरुष, अशांच्या ते नेहेमीं टेहळणीवर राहीत. आणि तसे कोणी सांपडले की, त्याच्याशी ते मैत्री करून त्यास मोठ्या आदरसत्काराने आपल्या बिहाडी आणित. त्यांचे बि-हाड तरी एखाद्या लहानशा गल्लीकुचीत होते असेंही नाही. तर ते भरवस्तीत अगदी शहरच्या मध्यावर एका मोठ्या वाड्यांत होते. तेथे त्या बिचान्यास व्हिस्की नांवाची खूपशी कडक दारू पाजीत; तो चांगला झिंगला ह्मणजे त्याला नेऊन बिछान्यावर निजवीत; आणि मग त्याचा जीव घेण्याचे काम उरकीत ! ह्यावरून ह्या कर्मचांडाळांनी मनुष्यमात्रासाठी जाळेंच पसरले होते, हे दिसून येईल; व दीन दुबळी असत ती त्यांत सांपडत. _ त्यांनी पहिला केलेला खून एका स्त्रीचा होता. ही स्त्री, त्यांच्या नादास लागून त्यांच्या बि-हाडी गेली होती. तिचा त्यांनी जीव घेऊन तें प्रेत एका पेटीत घातले, आणि एका मजुराकडून डाक्टराकडे नेले. दुसरा एक बि-हाडकरू सांपडला. हा आला तेव्हां त्या घरांत दुसरे कोणाचेंच बिन्हाड नव्हते. घर अगदी रिकामें होतें. तो मनुष्य सांसर्गिक रोगाने आजारी आहे, अशी लोकांची समजूत होती. त्याच्या कपाळीही हाच सोहळा भोगावयाचे आले. तिसऱ्या वेळी बर्कला एक पोलिस शिपायी भेटला. तो एका दारू पिऊन झिंगलेल्या बायकोला घेऊन पोलिसचौकीवर जात होता. बके थोडासा त्याच्या मागोमाग चालत जाऊन, जणों काय करुणा आली अशा मुद्रेने त्यास ह्मणाला "शिपाईबुवा! कशाला बिचारीच्या पाठीस लागतां? जाऊं द्या तिला घरी. गरीब आहे." अशा प्रकारे त्याचे मन वळवून तिला ह्या कमेचांडाळाने आपल्या बिन्हाडी आणली, आणि तिचीही नेहेमींच्या पद्धतीप्रमाणे वाट लावली! ह्याप्रमाणे त्यांचा हा गळेकापीचा धंदा जारीने चालू झाला. पुढे पुढे ते दोघे इतके धीट झाले की, त्या वाड्यांत अनेक बि-हाडकरू असतांही, हे आपले अघोर कर्म तेथें खुशाल चालवीत. पहिल्यापहिल्याने प्रेते रात्रीच्यारात्री ते रवाना करीत. पण पुढे पुढे त्यांचा धीटपणा इतका वाढला की, ते आपला माल उचलावयास दिवसाढवळ्या मजूर बोलावू लागले. प्रेताच्या पेटीत भोंवतीं थोडेसें गवत, चहाचे डबे, किंवा रिकाम्या बाटल्या भरीत, आणि तोच माल