या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. शरीरातील पेशांच्या क्रियांची गोळाबेरीज होय. आपला जीव ह्मणजे एक जगव्याळराज्य आहे. आणि ह्या पेशी ह्मणजे त्याच्या अंमलाखालील वसाहती होत; व त्याला जोडणारा जो मज्जातंतुजाल तेच सरकारदूत असें झटले तरी चालेल. पण ह्या योगाने जीव ह्मणजे काय पदार्थ आहे हे कळत नाहीं तें नाहींच. आंतल्या क्रिया कशा घडतात हे मात्र शास्त्रीयरीत्या कळतें. जीव ह्मणजे काय हे जसे आमच्या पूर्वजांस व साधुसंतांस कोडें होतें तसेंच तें अझूनही आहे. पण निदान ह्या पेशींचा जीव ह्मणजे काय हे जर आपणास कळेल तर आपणास आपला 'जीव' हणजे काय हा प्रश्न सोडविण्याचा मार्ग बराच स्पष्ट होईल. थोडक्यांत असें ह्मणतां येईल की वर सांगितलेल्या पेशा आपणाप्रमाणेच सजीव आहेत. परंतु जी शक्ति प्राटोप्ल्याझम ह्या सजीव तत्त्वाच्या साहाय्याने कार्य करते व त्यांतूनच जिचा प्रभाव कळतो, तिच्या संबंधानें व ती कार्य कसें करिते ह्याबद्दल काहीच कळत नाही. अझूनही ह्या पेशांसंबंधानें कांहीं मोठी मजेची माहिती सांगावयाची राहिलीच आहे. प्रत्येक प्राणी किंवा मनुष्य हा एकाच पेशीपासून मूळ उत्पन्न होतो. तीसच आपण व्यवहारांत अंडे किंवा बीज ह्मणतों. प्रत्येक बीजाचा मुख्य भाग मटला झणजे ही पेशी होय. व ह्याच बाजात किंवा पेशीत आपल्या जन्मदात्यांसारखें होण्याची प्रवृत्ति किंवा शक्ति अव्यक्तरूपानें वास्तव्य करीत असते. खरोखर ही एवढीच गोष्ट किती बरें आश्चर्याची आहे? ह्या एवढ्याशा सूक्ष्मदर्शक यंत्रांतून मात्र दिसणाऱ्या चिमुकल्या सजीव बीजांत आईबापांच्या वृत्ती, खभाव, गुणदोष व त्याचप्रमाणे त्याचसारखें स्वरूप बनविण्याची शक्ति असावी हा चमत्कार नव्हे तर काय ? ह्याच बीजरूपी पेशीचे जेव्हां शरीर बनूं लागते, तेव्हां ती विभागून तिच्या दोन पेशा होतात. ह्याप्रमाणे हजारों पेशा तयार झाल्या ह्मणजे त्यांचेच तंतू , रस वगैरे बनतात, व त्यांचेच पुढे प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवयव बनतात, व वर सांगितलेल्या मूळच्या किंवा प्रथमारंभीच्या पेशा की ज्यांपासून इतर हजारों उत्पन्न होतात त्या जणू काय देहरूपी इमारतीच्या विटाच होत. ह्या पेशांना व त्यांनी केलेल्या महत्वाच्या कार्यास अनुसरूनच रक्तांत सांपडणा-या पेशांची माहिती दिल्यास फार मजेची होईल.'