या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Ge अंक ६ वा. मे १९०१. 1 १०९ रक्तांमधील जे पांढरे रजःकण असतात (इंग्लिशमध्ये ज्यांस white Corpuscles म०) त्याच्याच ह्या पेशा होतात. आपण रक्त सूक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहूं लागलों तर ह्या पेशा (ज्या एका लहानशा रक्तबिंदूंत हजारोंच्या हजारों सांपडतात)खतंत्र रीतीने इतस्ततः फिरत असतांना नजरेस पडतात. सूक्ष्मदर्शक यंत्राच्या दृष्टिक्षेत्राखालून त्या सजीव प्राण्याप्रमाणे इकडे तिकडे फिरतात येवढेच नव्हे, तर त्यांची रूपातर हात असतात. आपण जर निळाची भुकणी त्यांजवळ टाकली तर ज्याप्रमाणे सूक्ष्म जंतू आपलें भक्ष्य खातांना दृष्टीस पडतात, त्याच-. प्रमाण ह्याही आपल्या आंगचा सजीव द्रव बाहेर टाकून त्यास गट्ट करतात. अर्थात् ह्या पेशा सजीव असून त्या शरीराच्या हरएक भागावर फिरत असतात. व खरोखर पाहिले असतां आरोग्यरक्षणाचे काना त्या पोलिसच होत हटल्यास काही वावगे होणार नाही. ज्या प्रमाण त्या आमच्या शरीरांत खेळत असतात. त्याचप्रमाणे एखाद्या बेडकाच्या मागील पायांच्या सांध्यांतून आरपार पाहिले तर त्या खेळवाना हष्टास पडतात. शिरांमुळे त्यांच्या गतीस कांहींच अडथळा होत नाही. त्या शिरांतून बाहेर येऊन त्या स्नायूंत जाऊन बसतात. एखाद्या रोगाची लस टोंचन शरीरांत भरली तर त्या रोगांच्या किड्याचा व आमच्या ह्या सजीव पेशांची लढाई होऊन रोगांच्या किड्याच बळ व संख्या कमी असल्याने आमच्या पेशा त्यांस पार गिळून टाकतात. ह्यांत कल्पनेचे असे काही नाही. आपणास यंत्रांतून पाहून खात्री करून घेता येते. असो. याप्रमाणे रोगाची बीजे टोचून प्राणी जर जगला तर त्याच्या शरीरातील पेशांनी रोगबीजांवर फत्ते मिळविली असा अर्थ समजावयाचा. तसेंच तो त्या रोगाने मेला तर रोगबीजांस जय मिळाला असें होतें. किंवा त्या रक्तांतील पांढऱ्या पेशांस जय मिळाला नाही असे होईल. देवी किंवा प्लेग टोचून घेण्यांतील तत्त्व हेच होय. ह्मणजे एकदा ह्या पांढऱ्या पेशा रोगबीजें गिळून बसल्या किंवा एकदां का ती त्यांच्या पचनी पडली झणजे सोमल खाणारास जशी सोमलाची बाधा होत नाही, तशीच त्याना प्लेगच्या किंवा देवीच्या कृमींचीही बाधा होत नाही. व त्यांस त्यांचा मोड करून गिळून टाकितां येतात. ह्यावरून असें अनुमान